या करारांतर्गत टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स हैदराबादमध्ये एक अत्याधुनिक उत्पादन केंद्र उभारणार आहे. येथे राफेलच्या पिछल्या भागाच्या शेल्स, संपूर्ण रियर सेक्शन, मध्य भाग आणि पुढील सेक्शन यांसह अनेक महत्त्वाचे घटक तयार केले जातील. 2028 पासून येथे उत्पादन सुरू होण्याची शक्यता आहे. आणि सुरुवातीला दर महिन्याला दोन संपूर्ण फ्यूजेलाज या युनिटमधून बाहेर पडू शकतील. ही पहिलीच वेळ असेल की राफेल विमानाचा ढाचा फ्रान्सबाहेर तयार होईल.
advertisement
बहावलपूरच्या कब्रिस्तानात भारताने घडवला हाहाकार, मसूद अजहर उर बडवून रडू लागला
दसॉ एव्हिएशनचे मत
दसॉ एव्हिएशनचे चेअरमन आणि सीईओ एरिक ट्रॅपियर यांनी सांगितले, फ्रान्सबाहेर राफेल फ्यूजेलाजचं उत्पादन हे आमच्यासाठी निर्णायक पाऊल आहे. भारतात स्थानिक सप्लाय चेन निर्माण करणे आणि टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टिम्ससारख्या सक्षम भागीदारासोबत काम करणे हे गुणवत्ता आणि स्पर्धात्मकता टिकवण्यासाठी उपयुक्त ठरेल.
टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टिम्सचे वक्तव्य
TASL चे सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर सुक्रण सिंग यांनी सांगितले, ही भागीदारी भारताच्या एअरोस्पेस क्षेत्राच्या वाटचालीत एक ऐतिहासिक टप्पा आहे. राफेल फ्यूजेलाजचे संपूर्ण उत्पादन भारतात करणे ही आमच्या तंत्रज्ञानावर असलेला विश्वास आणि दसॉसोबतचा मजबूत नातेसंबंध दर्शवतो. भारतात तयार होणाऱ्या आधुनिक एअरोस्पेस इकोसिस्टमचं हे उत्तम उदाहरण आहे.
नावावर कर्ज नाही, तरीही Loan फेडावे लागू शकते; नियम समजून घ्या, नाही तर...
‘मेक इन इंडिया’साठी मोठी चाल
ही भागीदारी केवळ तंत्रज्ञानाच्या बाबतीतच नव्हे, तर ‘मेक इन इंडिया’ मिशनसाठीही एक निर्णायक पाऊल ठरू शकते. या प्रकल्पामुळे स्थानिक रोजगाराच्या संधी वाढतील, आणि भविष्यात भारत राफेल विमानांच्या पार्ट्सचा जागतिक निर्यातदार बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ठळक मुद्दे
-फ्रान्सबाहेर पहिल्यांदाच राफेलचा फ्यूजेलाज भारतात तयार होणार
-हैदराबादमध्ये निर्माण होणार अत्याधुनिक प्रोडक्शन युनिट
-2028 पासून दर महिन्याला दोन फ्यूजेलाज तयार होण्याची अपेक्षा
-‘मेक इन इंडिया’ला नवे बळ, जागतिक बाजारात भारताचा दबदबा वाढणार
