तुमच्या नावावर कर्ज नाही, तरीही Loan फेडावे लागू शकते; नियम समजून घ्या, नाही तर बसेल झटका

Last Updated:

Loan: आजच्या काळात कर्ज घेणे सामान्य झाले असले तरी कर्जदाराचा मृत्यू झाल्यास कर्जाची जबाबदारी कोणावर येते हे अनेकांना माहीत नसते. बँकेचे नियम, वसुलीची प्रक्रिया आणि लोन इन्शुरन्सबाबत जाणून घेणे आवश्यक आहे.

News18
News18
मुंबई: घर, गाडी किंवा इतर गरजांसाठी कर्ज घेणे हे अगदी सामान्य झाले आहे. मात्र कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या कर्जाची जबाबदारी कोणावर येते? बँक त्याच्या नातेवाइकांकडून ती रक्कम वसूल करू शकते का? या संदर्भातील बँकिंग नियम काय आहेत सविस्तर जाणून घ्या...
कर्जदाराचा मृत्यू झाल्यास वसुली कशी होते?
जर एखाद्या कर्जदाराचा मृत्यू झाला. तर बँक प्रथम को-अप्लिकंट (सह-आवेदक) कडे वळते. हे सहसा गृहकर्ज, एज्युकेशन लोन किंवा जॉइंट लोनमध्ये असते. जर को-अप्लिकंट कर्ज फेडू शकत नसेल, तर बँक गारंटर (हमीदार) कडे वळते. गारंटरही असमर्थ असेल किंवा नकार दिल्यास, बँक कायदेशीर उत्तराधिकारी (legal heirs) कडे वळते. जसे की पत्नी, मुलं, आई-वडील आदी. बँक त्यांच्याकडे कर्ज फेडण्याची मागणी करू शकते.
advertisement
बँक मालमत्ता जप्त कधी करू शकते?
जर को-अप्लिकंट, गारंटर आणि कायदेशीर वारसदारांनी कर्ज फेडण्यास असमर्थता दर्शवली. तर बँकेला खालीलप्रमाणे जप्तीचा अधिकार असतो:
होम लोन: घर जप्त करून लिलावाद्वारे विक्री
ऑटो लोन: वाहन जप्त करून विक्री
पर्सनल लोन: इतर मालमत्तेवर जप्ती आणि विक्री
लोन प्रोटेक्शन इंश्युरन्स असल्यास काय?
जर कर्जदाराने लोन प्रोटेक्शन इंश्युरन्स घेतले असेल. तर त्याच्या मृत्यूनंतर संपूर्ण कर्ज विमा कंपनी भरते. त्यामुळे कुटुंबीयांवर कोणतेही आर्थिक ओझे येत नाही.
advertisement
कायदेशीर वारसदार जबाबदार आहेत का?
जर कायदेशीर वारसदाराने मृत व्यक्तीची मालमत्ता उत्तराधिकारात स्वीकारलेली असेल, तर त्याच्यावर कर्ज फेडण्याची जबाबदारी येते. मात्र जर मालमत्ता स्वीकारलेली नसेल तर बँक त्याच्यावर कर्ज फेडण्याचा प्रेशर टाकू शकत नाही.
view comments
मराठी बातम्या/मनी/
तुमच्या नावावर कर्ज नाही, तरीही Loan फेडावे लागू शकते; नियम समजून घ्या, नाही तर बसेल झटका
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement