बहावलपूरच्या कब्रिस्तानात भारताने घडवला हाहाकार, मसूद अजहर उर बडवून रडू लागला; 21 शव, 1 व्हिडीओ, 1 आवाज…
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Masood Azhar: भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेचे धक्कादायक पुरावे समोर आले असून पाकिस्तानच्या बहावलपूरमधील कब्रस्तानात जैश-ए-मोहम्मदच्या 21 दहशतवाद्यांच्या कबरी सापडल्या आहेत. यामध्ये मसूद अजहरच्या कुटुंबीयांचाही समावेश असल्याचे स्पष्ट होत आहे.
इस्लामाबाद: भारताच्या अचूक आणि प्रभावी सैन्य कारवाई ‘सिंदूर’च्या यशाचे नवीन पुरावे समोर आले आहेत. पाकिस्तानच्या बहावलपूर येथील एका कब्रिस्तानातील 21 दहशतवाद्यांच्या कबरींचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. हे दहशतवादी जैश-ए-मोहम्मद संघटनेशी संबंधित असून त्यात जैशचे प्रमुख मौलाना मसूद अजहर यांचे जवळचे आणि कुटुंबातील लोकही आहेत.
ऑपरेशनच्या वेळी मारले गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये मसूद अजहर यांच्या परिवारातील सदस्यांचा समावेश होता. या कबरी बहावलपूरच्या त्या ठिकाणी आहेत जिथे दहशतवाद्यांना दफन करण्यात आले आहे. हे फोटो ‘सिंदूर’ ऑपरेशनची विश्वासार्हता स्पष्टपणे दाखवतात आणि या कारवाईत भारताने थेट दहशतवादी संघटनेच्या उच्चस्तरीय नेत्यांना लक्ष्य केल्याचा संदेश देतात.
रशियाच्या उत्तराची जगाला भीती; युक्रेनवर होणार अति-विध्वंसक Missileने हल्ला
सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मसूद अजहर यांची आवाज देखील ऐकू येते. ज्याने या ऑपरेशनने दहशतवादी नेटवर्कला मोठा धक्का दिला आहे.
advertisement
या सैन्य कारवाईने जैश-ए-मोहम्मद आणि त्याच्या नेतृत्वाला मोठा फटका दिला असून, बहावलपूरच्या कब्रिस्तानातील या कबरींमुळे भारताच्या चोख आणि प्रभावी कारवाईचा पुरावा मिळतो. ऑपरेशन ‘सिंदूर’ ने दहशतवाद्यांना केवळ मोठ्या प्रमाणात ठार मारले नाही तर जैशच्या केंद्रीय भागांनाही कमकुवत केले आहे.
हे ऑपरेशन भारताच्या दहशतवादविरोधी निर्धाराचा ठोस प्रत्यय असून बहावलपूरमधील कब्रिस्तानातील फोटो ही भारताच्या या लढाईची जिवंत साक्ष आहेत. या कारवाईला सामाजिक आणि राजकीय स्तरावर मोठा पाठिंबा मिळाला असून याला एक महत्त्वपूर्ण सैनिकी यश मानले जात आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 04, 2025 8:36 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
बहावलपूरच्या कब्रिस्तानात भारताने घडवला हाहाकार, मसूद अजहर उर बडवून रडू लागला; 21 शव, 1 व्हिडीओ, 1 आवाज…


