युक्रेनची मोठी चूक, रशियाच्या उत्तराची जगाला भीती; कधीही न वापरलेलं अति-विध्वंसक Missileने होणार हल्ला

Last Updated:

Russia Ukraine War Update News: रशियाच्या घरात घुसून त्यावर हल्ला करून मोठे नुकसान करणे ही युक्रेनची कदाचित मोठी चूक ठरू शकते. याची त्यांना फार मोठी किंमत त्यांना मोजावी लागू शकते. रशिया युक्रेनियन जाळ्याला एका राक्षसी युक्तीने उत्तर देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.

News18
News18
मॉस्को: तीन वर्षांहून अधिक काळापासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाने आता एका नव्या आणि अत्यंत धोकादायक वळणावर प्रवेश केला आहे. युक्रेनने रशियाच्या तब्बल 4,000 किलोमीटर आत घुसून पाच लष्करी एअरबेसवर केलेला ड्रोन हल्ला हा रशियासाठी मोठा धक्का ठरला आहे. या हल्ल्याने संपूर्ण रशिया हादरले असून राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा संताप आता टोकाला पोहोचला आहे.
आता रशिया 'शैतान' सोडणार का?
पुतीन काय उत्तर देतील याची भीती सगळ्या जगाला वाटतेय. कारण आता चर्चा सुरू आहे ती रशियाच्या अत्यंत विध्वंसक आणि घातक अस्त्राची म्हणजेच RS-28 SARMATची होय. ज्याला पश्चिमी देशांनी "सैतान-2 (Satan-2)" असं नाव दिलं आहे. हे अस्त्र केवळ युक्रेनच नव्हे तर संपूर्ण युरोप व अमेरिकेसाठीही धोकादायक ठरू शकते.
advertisement
काय आहे 'सैतान-2'?
RS-28 SARMAT ही रशियाची इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल (ICBM) असून ती साधारण 15 अण्वस्त्र वॉरहेड्स एकाच वेळी वाहून नेऊ शकते आणि वेगवेगळ्या टार्गेट्सवर मार करू शकते. याची लांबी 116 फूट, वजन 220 टन, तर श्रेणी 6,200 ते 11,180 मैलांपर्यंत आहे. म्हणजे ती थेट अमेरिकेपर्यंत पोहोचू शकते.
युक्रेनचा रशियात अंडरवॉटर ब्लास्ट; 1,100 किलो स्फोटकांनी मॉस्को हादरले
ही मिसाईल सोव्हिएत युगातील R-36 ICBM ची जागा घेण्यासाठी बनवण्यात आली असून तिचे नाव बदलून RS-28 SARMAT ठेवण्यात आले आहे. तिच्या क्षमतेवरून पश्चिमी देशांनीच तिला ‘सैतान’ असं नाव दिलं आहे.
advertisement
शस्त्राशिवाय लढणारा रशिया
हे विशेष लक्षात घेण्यासारखे आहे की, युद्धात इतक्या वर्षांपासून सामरिक ताकद वापरत असूनही रशियाने आजवर हे अति-विध्वंसक शस्त्र कधीही वापरलेलं नाही. पण आता युक्रेनने रशियाच्या हृदयात घुसून हल्ला केला आहे. त्यामुळे पुतीन यांच्या हातून 'सैतान' सुटणार का? हा प्रश्न जगाला सतावत आहे.
advertisement
युक्रेनसाठी इशारा, जगासाठी चिंता
RS-28 SARMAT चा वापर झाला तर युक्रेनसाठी तो विनाशक असणार आहेच. पण त्याचे पर्यावरणीय, राजकीय आणि मानवी परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागतील. म्हणूनच जगभरात राजनैतिक हालचालींना वेग आला असून सगळ्यांचे लक्ष पुतीन काय निर्णय घेतात याकडे लागले आहे.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
युक्रेनची मोठी चूक, रशियाच्या उत्तराची जगाला भीती; कधीही न वापरलेलं अति-विध्वंसक Missileने होणार हल्ला
Next Article
advertisement
BJP Congress Alliance : पुन्हा भूकंपाचे संकेत! भाजप-काँग्रेस युतीच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ, कुठं जुळणार समीकरण?
पुन्हा भूकंपाचे संकेत! भाजप-काँग्रेस युतीच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ, कुठं
  • काही दिवसांपूर्वी अंबरनाथमध्ये भाजप-काँग्रेसच्या युतीमुळे मोठी खळबळ उडाली होती.

  • आता पुन्हा एकदा भाजप काँग्रेसची युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे.

  • काँग्रेस किंग मेकरच्या भूमिकेत असल्याने आज मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

View All
advertisement