TRENDING:

बेंजामिन नेतन्याहू यांची खरंच हत्या झालीये का? अखेर इस्रायल सरकारने दिली मोठी अपडेट

Last Updated:

Iran-Israel War : मध्यपूर्वेत वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या हत्येबाबत सोशल मीडियावर अनेक अफवा पसरल्या होत्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : मध्यपूर्वेत वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या हत्येबाबत सोशल मीडियावर अनेक अफवा पसरल्या होत्या. मात्र इस्रायल सरकारने हे सर्व दावे फेटाळून लावत ही माहिती पूर्णपणे खोटी असल्याचे स्पष्ट केले आहे.
Benjamin Netanyahu
Benjamin Netanyahu
advertisement

पंतप्रधान कार्यालयाने सांगितले की, सोशल मीडियावर पसरत असलेल्या या बातम्या “फेक न्यूज” आहेत आणि पंतप्रधान सुरक्षित आहेत. इराणवर इस्रायल आणि अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांचा बदला म्हणून नेतन्याहू यांची हत्या झाल्याचे काही पोस्टमध्ये म्हटले जात होते. याबाबत विचारले असता या सर्व अफवा आहेत. असं स्पष्टीकरण देणतात आले आहे.

संघर्षामुळे अफवा पसरल्या

सध्या इस्राइल आणि इराण यांच्यात तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवरच सोशल मीडियावर अशा अफवा वेगाने पसरू लागल्या. या संघर्षाची सुरुवात २८ फेब्रुवारीला झाली, जेव्हा इस्रायल आणि अमेरिका यांनी इराणमधील काही ठिकाणांवर संयुक्त हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. काही अहवालांनुसार, इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्यासह १,२०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती.

advertisement

इराणचे प्रत्युत्तर

या हल्ल्यानंतर इराणनेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. इराणकडून ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये इस्रायलसह जोरदेण , इराक आणि आखाती देशांतील काही भागांना लक्ष्य करण्यात आले.

इराणने म्हटले आहे की, हे हल्ले प्रामुख्याने या प्रदेशातील अमेरिकेच्या लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यासाठी करण्यात आले.

नेतन्याहू यांचा इशारा

दरम्यान, नेतन्याहू यांनी इराणचे नवीन सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. मोजतबा खामेनी हे अली खामेनी यांचे पुत्र असून त्यांना इराणच्या नेतृत्वाचे संभाव्य वारस मानले जाते.

advertisement

याबाबत बोलताना नेतन्याहू म्हणाले की, दहशतवादी संघटनांना पाठिंबा देणाऱ्या कोणत्याही नेत्याला ते सुरक्षा हमी देऊ शकत नाहीत. इस्रायल पुढे काय पावले उचलणार आहे, याबाबत त्यांनी सविस्तर माहिती देण्यास नकार दिला.

मध्यपूर्वेतील परिस्थिती बदलली

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दोनदा अपयश पण जिद्द नाही सोडली, पुण्याच्या आर्याने कंपनी सेक्रेटरी परीक्षेत मिळवलं यश, Video
सर्व पहा

नेतन्याहू यांनी असेही सांगितले की, अलीकडील घडामोडींमुळे मध्यपूर्वेतील परिस्थितीत मोठा बदल झाला आहे. त्यांच्यानुसार आता हा प्रदेश, इराण आणि इस्रायल आधीसारखे राहिलेले नाहीत. इस्रायल आता केवळ प्रतीक्षा करत नाही, तर पुढाकार घेत कारवाई करत आहे. तसेच, या संघर्षामुळे इराणमध्ये राजकीय बदल होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते, असेही त्यांनी म्हटले.

advertisement

मराठी बातम्या/विदेश/
बेंजामिन नेतन्याहू यांची खरंच हत्या झालीये का? अखेर इस्रायल सरकारने दिली मोठी अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल