SBU ने दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईची योजना महिन्यांपूर्वी आखली गेली होती. विशेष प्रशिक्षित गोताखोरांनी पुलाच्या पाण्याखालच्या आधारस्तंभांवर सुमारे 1,100 किलो स्फोटके लावली होती. हा स्फोट स्थानिक वेळेनुसार सकाळी 4:44 वाजता झाला. या स्फोटात कोणतीही नागरी हानी झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. SBU च्या म्हणण्यानुसार आता हा पूल “वापरासाठी असुरक्षित” झाला आहे.
advertisement
कोणीच सेफ नाही, रशियावरील हल्ल्यानंतर समोर आले भयानक सत्य; वॉशिंग्टन हादरले
या मिशनचे नेतृत्व SBU प्रमुख लेफ्टनंट जनरल वासिल माल्युक यांनी स्वतः केले. त्यांनी यानंतरच्या निवेदनात म्हटले, देवाला त्रिकाळाची ओढ असते आणि SBU जे सुरू करते, ते पूर्ण करूनच थांबते. 2022 आणि 2023 मध्ये आम्ही क्राइमिया ब्रिजवर हल्ला केला होता. आज आम्ही ही परंपरा कायम ठेवली – यावेळी पाण्याखाली.
युक्रेनच्या बाजूने या स्फोटाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. मात्र त्याची सत्यता स्वतंत्रपणे पडताळता आलेली नाही.
भारताला धडा शिकवण्याच्या नादात बेक्कार फसला चीन; पाकला मदत म्हणजे डोक्याला ताप
वासिल माल्युक यांच्या मते, क्राइमिया ब्रिज हा पूर्णतः वैध लष्करी लक्ष्य आहे कारण रशिया याचा वापर तुकड्या आणि युद्धसामग्री युक्रेनच्या कब्जातील भागात पाठवण्यासाठी करतो.
यापूर्वी ऑक्टोबर 2022 मध्ये ट्रक बॉम्बद्वारे या पुलावर मोठा स्फोट झाला होता. ज्यामध्ये काही लोकांचा मृत्यू झाला आणि पुलाचा महत्त्वाचा भाग कोसळला. जुलै 2023 मध्ये दुसऱ्यांदा सागरी ड्रोन हल्ला झाला होता. ज्यामुळे पुलाची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. या दोन्ही कारवायांची जबाबदारी SBU ने याआधीच स्वीकारली आहे.
ऐतिहासिक क्षण, पुढचा एअर स्ट्राईक महाराष्ट्रातून होणार; नाशिकमध्ये सुपरफाइटर...
नवीन हल्ला त्या घटनेच्या केवळ दोन दिवसांनी घडला. जेव्हा युक्रेनने रशियाच्या आतल्या भागात मोठा ड्रोन हल्ला केला होता. “ऑपरेशन स्पायडरवेब” अंतर्गत AI-चालित ड्रोननी रशियातील महत्त्वाचे हवाई तळ लक्ष्य करत 40 हून अधिक विमानं – ज्यामध्ये Tu-95, Tu-22 बॉम्बर्स आणि A-50 रडार विमान – उद्ध्वस्त केल्याचा दावा करण्यात आला आहे.
1 जून रोजीच्या या हल्ल्यात रशियाच्या क्रूझ मिसाईल वाहक क्षमतेपैकी 34% भाग निष्क्रिय झाल्याचा दावा युक्रेनने केला आहे. यामुळे रशियन हवाई तळांवरील संरक्षण यंत्रणा पूर्णपणे गोंधळलेल्या अवस्थेत सापडल्या. या हल्ल्यामुळे अंदाजे 2 ते 7 अब्ज डॉलर्स इतकं नुकसान झाल्याचंही युक्रेनच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.