TRENDING:

VIDEO : कॉलर ओढली, खाली पाडलं; 2 कॅब ड्रायव्हरची भररस्त्यात हाणामारी, कारण जाणून डोक्यावर माराल हात

Last Updated:

कॅब घेण्यासाठीही बऱ्याचदा प्रवाशांचे एकमेकांशी वाद होत असतात. मात्र प्रवाशांवरुन कधी कॅब ड्रायव्हरमध्ये वाद झालेला पाहिलाय का? सध्या एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये दोन कॅब ड्रायव्हर प्रवाशांवरुन हाणामारी करत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली: बाहेर प्रवास करताना लोक सहसा सार्वजनिक वाहनांचा उपयोग करतात. मात्र कधी गर्दीमुळे किंवा लवकर पोहोचण्यासाठी रिक्षा, टॅक्सी, कॅबही बुक करताना दिसतात. यामुळे त्यांचा वेळही वाचतो आणि जास्त गर्दीचा सामनाही करावा लागत नाही. कॅब घेण्यासाठीही बऱ्याचदा प्रवाशांचे एकमेकांशी वाद होत असतात. मात्र प्रवाशांवरुन कधी कॅब ड्रायव्हरमध्ये वाद झालेला पाहिलाय का? सध्या एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये दोन कॅब ड्रायव्हर प्रवाशांवरुन हाणामारी करत आहेत.
2 कॅब ड्रायव्हरची भररस्त्यात हाणामारी
2 कॅब ड्रायव्हरची भररस्त्यात हाणामारी
advertisement

प्रवाशांवरुन कॅब ड्रायव्हरमध्ये भांडण होतानाच्या घटना खूप क्वचित पहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय. दोन्ही ड्रायव्हरने अक्षरशः एकमेकांना चांगलंच धुतलं. अखेर पोलिसांना त्यांची भांडणे सोडवण्यासाठी हस्तक्षेप घ्यावा लागला.

व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, दोन लोक एकमेकांची कॉलर पकडून भांडत आहेत. भररस्त्यात एकमेकांनी खाली पाडून मारत आहेत. त्यामुळे आजबाजूला गर्दी झाली आणि लोक थांबून त्यांची भांडणं बघत आहेत. काही लोक येऊन त्यांना आवरण्याचा प्रयत्न करतात मात्र ते काही ऐकायलाच तयार होत नाहीत आणि भांडण करत राहतात. शेवटी पोलीस आल्यावर दोघंही शांत होतात आणि प्रकरण शांत होत.

advertisement

भांडण करणारे दोघेही कॅब चालक होते आणि प्रवाशांसाठी एकमेकांशी भांडत होते, असा दावा केला जात आहे. हा व्हिडिओ दिल्लीला लागून असलेल्या नोएडा येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. @gharkekalesh नावाच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 37 सेकंदांचा हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होतोय.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आल्याचे भाव तेजीत, डाळींब आणि केळीला काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

दरम्यान, असे भांडणांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत असतात. कोण कधी कशावरुन भांडेल काही सांगता येत नाही. असे भरपूर व्हिडीओ दिवसभरात समोर येत असतात.

मराठी बातम्या/Viral/
VIDEO : कॉलर ओढली, खाली पाडलं; 2 कॅब ड्रायव्हरची भररस्त्यात हाणामारी, कारण जाणून डोक्यावर माराल हात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल