TRENDING:

नवऱ्याला वैतागल्या म्हणून 2 बायकांनी एकमेकींसोबत थाटला संसार, आता...

Last Updated:

एक महिला पती आणि दुसरी पत्नी बनली. लग्नादरम्यान दोघींनी आपलं नावही बदललं. यापैकी एका महिलेने तिचं नाव बदलून गुंजा आणि दुसरीनं तिचं नाव बबलू ठेवलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
लखनऊ : पती-पत्नी म्हणजे भांडणं आलीच. पण काही प्रकरणात पती पत्नीला इतका त्रास देतो की हा त्रास सहन करण्यापलीकडे असतो. अशाच पतींच्या त्रासाला वैतागलेल्या दोन महिला. सारखं दुःख असलेल्या या दोन महिलांची सोशल मीडियावर भेट झाली. त्यांच्यात मैत्री झाली, मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि दोघींनी लग्नही केलं.
पतीला वैतागलेल्या पत्नींचं लग्न
पतीला वैतागलेल्या पत्नींचं लग्न
advertisement

उत्तर प्रदेशातील या अनोख्या लग्नाची चर्चा सगळीकडे होते आहे. गोरखपूरमध्ये राहणाऱ्या दोन महिला. गोरखपूरमधून देवरियामध्ये पळत जाऊन दोन्ही महिलांनी समलैंगिक विवाह केला आहे. देवरियाच्या नाथबाबा मंदिरात या महिलांचा विवाह झाला.

नियतीचा चमत्कार! शाळेच्या नाटकात केलं होतं लग्न, आता 20 वर्षांनी खऱ्या आयुष्यात झाले विवाहबद्ध

advertisement

या दोन्ही महिलांचं त्यांच्या पतीसोबत दररोज कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडण होत होतं. महिलांनी सांगितलं की, त्यांचे पती दारू पितात. दारू पिऊन ते  शिवीगाळ करायचे, मारहाण करायचे. दारू पिण्यास विरोध केला असता त्याला घरातून हाकलून देण्याची धमकी द्यायचे.

सारखं दुःख, भावनिक संबंध जुळले

या दोघींची भेट सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली. इन्स्टाग्रामवर दोघी भेटल्या आणि त्यांची मैत्री झाली. दोघांनीही आपापली दुःख वाटून घेतलं आणि त्यांचा एकमेकींवर जीव जडला. चार-पाच वर्षांच्या मैत्रीत ते प्रत्येक सुख-दु:खात एकमेकांचे आधार बनले. दोघांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. भावनिक संबंधाने त्यांना आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेण्यास भाग पाडलं. दोघांनी पंधरवड्यापूर्वी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

advertisement

घर, पती सोडून पळून केलं लग्न

दोघींनीही आपल्या नवऱ्यांना सोडलं. घरातून त्यांनी पळ काढला. दोघीही गोरखपूर जिल्ह्यातून देवरिया इथं पळून गेल्या. तिथं शंकराच्या मंदिरात त्यांनी लग्न केलं. गुरूवारी रुद्रपूरच्या दुघेश्वर नाथ मंदिरात त्यांचं लग्न झालं. यापैकी एक महिला पती आणि दुसरी पत्नी बनली. लग्नादरम्यान दोघींनी आपलं नावही बदललं. यापैकी एका महिलेने तिचं नाव बदलून गुंजा आणि दुसरीनं तिचं नाव बबलू ठेवलं.

advertisement

IT कंपनीची मालकीण, कर्मचाऱ्याच्या प्रेमात! त्याच्यासाठी प्रॉपर्टी-कंपनीही गहाण ठेवली, लग्नानंतर भयानक शेवट

या त्रासाला कंटाळून त्यांनी समलैंगिक व्यक्तीशी लग्न केलं. देवाला साक्षी घेऊन महिलांनी दुगेश्वरनाथ मंदिराच्या सात प्रदक्षिणा घातल्या. या महिलांनी सांगितलं की, त्या एकमेकींशिवाय राहू शकत नाहीत. आपण गोरखपूरला जाणार पण आपल्या घरी परतणार नाही. गोरखपूरमध्ये एकत्र राहून नोकरी करून स्वावलंबी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
नवऱ्याला वैतागल्या म्हणून 2 बायकांनी एकमेकींसोबत थाटला संसार, आता...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल