अहमदाबाद जिल्ह्यातील सानंद तालुक्यातील लोदरियार गावातील हे प्रकरण. एका घरात एक महिला, एक पुरुष आणि एका लहान मुलीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. माहितीनुसार मृत तरुणाचं नाव रणछोड परमार असं आहे. तो एका खाजगी कंपनीत काम करत होता. रणछोड सुमारे 20 दिवसांपासून लोदरियार गावात भाड्याच्या घरात राहत होता.
मुलाचे दुसऱ्या महिलेशी संबंध, सासरा सुनेसोबत; खुलेआम दिली अशी ऑफर, सगळीकडे चर्चा
advertisement
रणछोड ज्याचं लग्न झालं होतं. त्याच्या पत्नीसोबतचा घटस्फोटाचा खटला कोर्टात प्रलंबित होता. त्याचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते, तीसुद्धा आधीच विवाहित होती आणि तिला दोन वर्षांची मुलगी होती. ती महिला तिच्या मुलीसह रणछोडच्या भाड्याच्या घरात आली. त्याच रात्री उशिरा तिघांचेही मृतदेह त्यांच्या खोलीत रक्ताच्या थारोळ्यात आढळले. त्यांचे गळे धारदार शस्त्राने कापण्यात आले होते.
मीडिया रिपोर्टनुसार पोलिसांना घटनास्थळावरून 8 पानांची सुसाईड नोट सापडली, ज्यामध्ये रणछोडने संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती दिली. त्याने सांगितलं की, त्याच्या प्रेयसीचे दुसऱ्या पुरुषाशी प्रेमसंबंध असल्याने तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता. तो माणूस त्याला सतत धमकावत होता. तो ताण आणि अपमान सहन करू शकत नव्हता. या रागामुळे आणि मानसिक दबावामुळे त्याने आधी त्याच्या प्रेयसीची आणि तिच्या मुलाची हत्या केली आणि नंतर स्वतःचं आयुष्यही संपवलं.
बायको असताना गर्लफ्रेंडसोबत रोमान्स, उद्ध्वस्त झाला, प्रायव्हेट पार्ट गमावला
पोलिसांनी सुसाईड नोट जप्त केली आहे आणि त्याच्या हस्ताक्षराची तपासणी करत आहेत. चिठ्ठीत नमूद केलेल्या धमक्यांची देखील चौकशी केली जात आहे. खून आणि आत्महत्येचा क्रम निश्चित करण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळावरून फॉरेन्सिक पुरावे गोळा केले आहेत. तिघांचेही मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आले आहेत.