नरसिंगपूर येथील कारागिराने बनवलेला एक इंच, 9 ग्रॅम वजनाचा चांदीचा तराजू मागे टाकत डॉ. सक्का यांनी फक्त 50 मिलीग्राम सोन्यात 3 मिमी आकाराचा तिरंगी तराजू बनवला आहे. विशेष म्हणजे हा तराजू पारंपारिक स्वरूपात बनवला असून, तो फक्त एका खास लेन्सच्या मदतीनेच पाहता येतो.
तीन दिवसांत केली ही किमया
या तराजूचा दांडा 3 मिमी जाड असून, त्याला प्रत्येकी 1 मिमीचे दोन पारडे आहेत. 1 मिमीची हँडल आणि अर्धा मिमी पारंपारिक वजनांची प्रतिकृतीही यात बनवण्यात आली आहे. हे इतके बारीक काम पूर्ण करण्यासाठी डॉ. सक्का यांना तीन दिवस लागले. डॉ. सक्का म्हणाले की, सोन्याचा हा सर्वात लहान तराजू 10 मिग्रॅ ते 100 मिग्रॅ पर्यंतचे वजन अचूक मोजण्यासाठी वापरला जाऊ शकतो. ही अनोखी कलाकृती त्यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाला भेट द्यायची आहे. यासाठी त्यांनी राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून परवानगी मागितली आहे.
advertisement
लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद
सक्का म्हणतात की, न्यायाचे प्रतीक असलेला हा तराजू भारताच्या न्यायव्यवस्थेचे प्रतीक आहे आणि तो न्याय, समानता आणि सचोटीच्या मूलभूत तत्त्वांना प्रतिबिंबित करतो. त्यांनी या तराजूची जगातील सर्वात लहान तिरंगी न्यायाची तराजू म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्याचा दावाही केला आहे. ही उपलब्धी केवळ उदयपूर किंवा राजस्थानसाठीच नव्हे, तर संपूर्ण भारतासाठी अभिमानाची बाब आहे. डॉ. सक्का यांची ही लहान आणि गुंतागुंतीची कलाकृती पुन्हा एकदा सिद्ध करते की भारतीय कारागिरी जगात अतुलनीय आहे.
हे ही वाचा : Plane Crash : तेच ठिकाण, तोच मार्ग! अवघ्या 48 तासांत 2 प्लेन क्रॅश, संपूर्ण जग हादरलं होतं
हे ही वाचा : ऐकावं ते नवल! माहेरच्यांनी नवरीला सोनं आणि पैशांसह दिल्या 100 मांजरी, कारण असं की...
