टिकटॉकवर प्रेम कहाणी : 'द सन'च्या रिपोर्टनुसार, 35 वर्षीय टिफनी गुडटाइमचे टिकटॉकवर अकाउंट आहे, ज्यावर ती तिच्या जीवनाशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. ती टिकटॉकवर तिच्या नात्याबद्दलही बऱ्याच गोष्टी सांगते. टिफनी विस्कॉन्सिनची रहिवासी आहे. ती तिच्या वडिलांच्या वयाच्या पुरुषाच्या प्रेमात आहे. एका व्हिडिओमध्ये टिफनीने सांगितले की, तिला मध्यमवयीन पुरुषच आवडतात.
advertisement
वृद्धाश्रमात झाले प्रेम : काही दिवसांपूर्वी ती एका वृद्धाश्रमात गेली होती, जिथे तिला एक 80 वर्षांचा माणूस दिसला. तो तिला इतका आवडली की हळूहळू ती त्याला भेटू लागली आणि मग त्याला घरी घेऊन आली. दोघेही एकाच घरात राहू लागले आणि आता लवकरच ते लग्न करणार आहेत. टिफनीने सांगितले की, तिच्या या निर्णयाने तिचे कुटुंब फारसे खूश नाही. पण त्यांना त्याची पर्वा नाही.
सोशल मीडियावर ट्रोलिंग : एका व्हिडिओमध्ये टिफनी म्हणाली की, तिला वृद्ध लोकांची संगत आवडते. सोशल मीडियावर हजारो लोक तिला फॉलो करतात. पण बहुतेक लोक तिला ट्रोलही करतात. अनेकवेळा लोक म्हणतात की, टिफनी त्या व्यक्तीसोबत फक्त पैशासाठी आहे. त्याचवेळी, अनेक लोक तिला खूप भाग्यवानही मानतात. तथापि, काही लोक असे आहेत जे तिला पाठिंबा देतात. ते म्हणतात की, जर दोघेही एकत्र आनंदी असतील तर त्यांनी इतरांची पर्वा करू नये. एकाने म्हटले की, टिफनी फक्त त्याच्या बँक खात्यावर प्रेम करते.
हे ही वाचा : Motorola ने लॉन्च केला सर्वात परडवणारा स्मार्टफोन! फीचर्स आहेत जबरदस्त
हे ही वाचा : Fastag Sticker: फास्ट टॅग स्टिकर कुठून घ्यायचा, किंमत किती, कसा करायचा अर्ज?
