TRENDING:

16 व्या मजल्याहून पडला 4 वर्षाचा मुलगा; जीव वाचवण्यासाठी धावत गेले लोक, पण दिसला मोठा 'चमत्कार'

Last Updated:

साधारणपणे ज्या उंचीवरून पडल्यानंतर माणसाची जगण्याची शक्यता पूर्णपणे संपुष्टात येते, त्या उंचीवरून एक लहान मुलगा पडला. मात्र...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : देव तारी त्याला कोण मारी! ही म्हण तुम्ही लहानपणापासून अनेकदा ऐकली असेल. कधीकधी अगदी लहान अपघात किंवा छोट्या कारणांमुळे माणसाचा मृत्यू होतो. तर कधीकधी अतिशय भीषण दुर्घटना घडूनही जीव वाचतो. सध्या असंच एक प्रकरण समोर आलं आहे, ज्याबद्दल जाणून तुम्हीही चकित व्हाल.
16 व्या मजल्याहून पडला 4 वर्षाचा मुलगा
16 व्या मजल्याहून पडला 4 वर्षाचा मुलगा
advertisement

ही घटना फ्रान्समधून समोर आली आहे. साधारणपणे ज्या उंचीवरून पडल्यानंतर माणसाची जगण्याची शक्यता पूर्णपणे संपुष्टात येते, त्या उंचीवरून एक लहान मुलगा पडला. मात्र, यानंतर तो ज्या अवस्थेत दिसला, ते पाहून लोकांचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना. सगळ्यांना वाटलं, की कदाचित तो आता वाचणार नाही किंवा अतिशय गंभीर अवस्थेत त्याला रुग्णालयात न्यावं लागेल. मात्र, त्यांना तो अगदी आरामात चालताना दिसला.

advertisement

Online in Marathi : ऑनलाईनला मराठीत काय म्हणतात रे भाऊ? उत्तर देण्यात 99 टक्के लोक फेल

ऑडिटी सेंट्रल वेबसाइटनुसार, हा मुलगा फ्रान्सच्या ऑबरविलियर्सचा असून त्याचं नाव एन्झो आहे. 26 मे रोजी ही घटना घडली. यात 4 वर्षांचा एन्झो त्याच्या खोलीत रडत होता. त्याचे वडील त्याला पाहण्यासाठी गेले असता दरवाजा आतून बंद असल्याचं दिसलं. कसं तरी वडिलांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला, मात्र तोपर्यंत मुलगा खोलीतून गायब झालेला आणि खिडकी उघडी होती. ते 16 व्या मजल्यावर राहत असल्याने वडील घाबरले. त्यांनी लगेचच खाली डोकावून पाहिलं असता मुलगा खाली कोसळला असून धुळीने झाकलेला दिसला. तो काहीही हालचाल करत नव्हता.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

वडील इतर काही लोकांसह मुलाकडे पोहोचले, तेव्हा त्यांनी डोळ्यासमोर जे पाहिलं त्यावर त्यांचा विश्वासच बसेना. त्यांनी पाहिलं की एन्झो केवळ जिवंत नव्हता तर तो व्यवस्थित चालतही होता. त्याच्या अंगावर कोणतीही जखम किंवा रक्तस्त्राव नव्हता. त्याच्या पायावर फक्त थोडासा ओरखडा होता. मात्र, अंतर्गत रक्तस्त्राव आणि दुखापतीची भीती असल्याने पालकांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेलं आणि 7 दिवसांसाठी रुग्णालयात दाखल केलं. मुलाच्या किडनी आणि फुफ्फुसात किरकोळ रक्तस्त्राव झालेला. या व्यतिरिक्त काहीही सापडलं नाही आणि त्याला डिस्चार्ज देण्यात आला.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
16 व्या मजल्याहून पडला 4 वर्षाचा मुलगा; जीव वाचवण्यासाठी धावत गेले लोक, पण दिसला मोठा 'चमत्कार'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल