काशीमध्ये अशा अनेक स्मशानभूमी आहेत. जिथं चिता 24 तास जळत असतात. इथं चितेची राख थंड होत नाही. पण फार कमी लोकांना माहिती असेल की काशीच्या भूमीवर पाच लोकांचे मृतदेह कधीही जाळले जात नाहीत. हे मृतदेह स्मशानभूमीतून परत केले जातात. सोशल मीडियावर एका खलाशाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता, ज्यामुळे यामागील रहस्य उलगडलं आहे.
advertisement
Shocking! वडिलांच्या शवपेटीसोबत कबरीत गेलं संपूर्ण कुटुंब, अंत्यसंस्कारावेळी भयंकर घडलं
गंगा नदीवर पर्यटकांना फिरायला घेऊन जाताना या खलाशाने एक मोठं रहस्य उलगडलं. त्याने सर्वांना सांगितलं की काशीमध्ये पाच प्रकारच्या मृतदेहांचे दहन करण्यास मनाई आहे. कोणीही त्यांच्या मृतदेहांचे दहन करत नाही. या पाच लोकांमध्ये कोणाकोणाचा समावेश आहे ते पाहुयात.
1) या यादीतील पहिलं नाव साधूंचं आहे. साधूंचे मृतदेह जाळले जात नाहीत. त्यांच्या मृतदेहाचं जमिनीत दफन केलं जातं किंवा पाण्यात विसर्जन केलं जातं.
2) काशीमध्ये लहान मुलांचे मृतदेहही जाळता येत नाहीत. जर 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाचा मृत्यू झाला त्याचे अंत्यसंस्कार केले जात नाहीत. या मुलांना देवाचं रूप मानलं जातं. या कारणास्तव त्यांना अग्नी देण्यास बंदी आहे.
3) या यादीत गर्भवती महिला तिसऱ्या क्रमांकावर आहेत. जर त्यांच्या मृतदेहाचे दहन केलं तर त्यांचं पोट चितेवर फुटेल आणि आत वाढणारे मूल बाहेर येऊन वरच्या दिशेने उडेल. हे चांगलं दिसणार नाही. या कारणास्तव, गर्भवती महिलांचे मृतदेह देखील जाळले जात नाहीत.
4) साप चावल्याने मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तीचे काशीमध्ये अंत्यसंस्कारही केले जात नाहीत. असं म्हटलं जातं की साप चावल्याने मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तीचा मेंदू 21 दिवस जिवंत राहतो. अशा परिस्थितीत, त्यांचे मृतदेह केळीच्या खोडाला बांधून पाण्यात तरंगवलं जातं. यामागील श्रद्धा अशी आहे की जर एखाद्या तांत्रिकाची नजर या मृतदेहावर पडली तर तो ते पुन्हा जिवंत करू शकतो. या कारणास्तव त्याचं शरीर जाळलं जात नाही.5
5) याशिवाय, त्वचेच्या आजाराने किंवा कुष्ठरोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाला तरी काशीमध्ये त्याचं शरीर जाळलं जात नाही. असं म्हटलं जातं की जर त्याच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले तर रोगाचे जीवाणू हवेत पसरतात आणि इतर लोक देखील या आजाराचे बळी ठरू शकतात. या कारणास्तव, काशीमध्ये त्यांचे मृतदेह जाळण्यास बंदी आहे.
(सूचना : ही माहिती धार्मिक श्रद्धेच्या आधारे देण्यात आली आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. न्यूज18मराठी याची हमी देत नाही. कुणाच्याही वैयक्तिक किंवा धार्मिक भावना दुखावण्याचा न्यूज18मराठीचा उद्देश नाही.)