उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमधील बँकेतील ही घटना आहे. लाखो खाती अशी आहेत जिथं लोकांनी पैसे जमा केले पण ते त्यांनी काढलेच नाही. यामुळे जिल्ह्यातील बँकांमध्ये कोट्यवधी रुपये जमा झाले आहेत. फिरोजाबाद लीड बँकेचे अधिकारी रमण कांत सिंग यांनी लोकल18 शी बोलताना सांगितलं की, फिरोजाबादच्या बँकांमध्ये लाखो लोकांची खाती आहेत, ज्यात कोट्यवधी रुपयांच्या ठेवी आहेत. लोकांनी खाती उघडली, पैसे जमा केले आणि नंतर ते विसरले. ही खाती बंद केलेली नाहीत.
advertisement
जर आपण सर्व बँकांचा एकत्रित विचार केला तर 3,30,000 खाती आहेत ज्यात एकूण अंदाजे 86 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. सेव्हिंग अकाऊंट, करंट अकाऊंट, एफडी असे मिळून ही खाती आहेत ज्यात पैसे झाल्यापासून कोणतेही व्यवहार झालेले नाहीत, असं त्यांनी सांगितलं.
आता जर हे पैसे काढले गेले नाहीत तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ते जप्त करेल. परिणामी बँकेने भारत सरकारच्या 'माझी भांडवल, माझा हक्क' मोहिमेअंतर्गत दरब्राई येथील विकास भवन इथं लोकांसाठी एक कॅम्प लावण्याचा निर्णय घेतला. इथं लोकांनी त्यांच्या खाते तपशील, कागदपत्रांसह येण्यास सांगितलं.जर कुटुंबातील एखाद्याचे खातेदार मृत झाले असतील किंवा इतर कोणत्याही कारणामुळे ते खाते चालवू शकत नसतील, तर कुटुंबातील कोणताही सदस्य इथं येऊन माहिती घेऊ शकतो. ज्यांचे पैसे असतील त्यांना ते पैसे मिळतील. बँक अशा ग्राहकांना त्यांचे पैसे काढण्यास पूर्ण मदत करेल, असं ते म्हणाले.
ऐका, ऐका, ऐका! एक तास दारू FREE!! कित्येकांच्या आवडीची घोषणा, तरी भडकले लोक; पण का?
हा कॅम्प 1 नोव्हेंबर रोजी लावण्यात आला होता. यानंतर पुढे काय झालं त्याबाबतची माहिती अद्याप आलेली नाही. ही माहिती मिळाली की नक्कीच आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवू. पण तुम्ही किंवा तुमचे आजोबा पणजोबा तर असे बँकेत पैसे ठेवून विसरलेले तर नाहीत ना?
