TRENDING:

Viral News : व्यक्तीला विचित्र व्यसन; दिवसभर घेतो वास आणि त्याचाच लावतो परफ्युम

Last Updated:

लोकांना अनेक वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात. त्यामुळे ते वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देऊन तेथील प्रसिद्ध खाद्यपदार्थ ट्राय करतात. एकच गोष्ट सारखी खाल्ली की लोकांचं त्याच्यावरचं मन उठतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली, 11 ऑगस्ट : लोकांना अनेक वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात. त्यामुळे ते वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देऊन तेथील प्रसिद्ध खाद्यपदार्थ ट्राय करतात. एकच गोष्ट सारखी खाल्ली की लोकांचं त्याच्यावरचं मन उठतं. रोज काहीतरी नवीन खावं असं लोकांना वाटत असतं. मात्र असाही एक व्यक्ती आहे, जो सतत एकच गोष्ट खातो, त्याचा वास घेतो आणि त्याचाच परफ्युमही मारतो. सध्या या व्यक्तीची इंटरनेटवर चांगलीच चर्चा रंगली आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया.
person addicted to eating fish
person addicted to eating fish
advertisement

एका व्यक्तीला विचित्र व्यसन आहे. तो सतत मासे खातो. आता त्याचं व्यसन एवढं वाढलं आहे की तो सतत त्याचा वास घेतो, त्याचं परफ्युम वापरतो. हा व्यक्ती अमेरिकेचा असून त्यानं स्वतः याविषयी सांगितलं.

माश्यांचा ज्युस, लोक दूरुन दूरुन येतात प्यायला; VIDEO पाहून येईल किळस

लॉरेंस कंसास येथे राहणाऱ्या या व्यक्तीचं नाव टायलर आहे. टायलरनं माय स्ट्रेंज एडिक्शन या कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. यावेळी त्यानं त्याच्या या विचित्र सवयीविषयी सांगितलं. मला रोज, रोज, रात्रभर, कधीही ट्यूनाचा वास आवडतो, असं टायनर म्हणाला.

advertisement

टायलरची आई उर्सुला यांनीही मुलाच्या या सवयीविषयी सांगितलं. त्याला नेहमी मासे आवडतात. जेव्हा तो लहान होता तेव्हा इस्टरवेळी त्याच्या टोपलीत चॉकलेट असतील असं इतर मुलांना वाटायचं मात्र तो टोपलीत ट्यूना आणि सार्डिन माशांचे कॅन ठेवायचा. हळूहळू हे व्यसन कधी झालं कळलंच नाही.

Shocking News : लग्नाच्या 40 वर्षांनंतर महिलेनं पतीला दिलं विष, मुलीला पाठवला धक्कादायक मेसेज

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पवना नदीचं आरोग्य धोक्यात, नागरिकांना सहन करावा लागतोय त्रास, कारण काय?
सर्व पहा

दरम्यान, जगभरात लोकांना वेगवेगळ्या गोष्टींचं व्यसन असतं. आपण विचारही करु शकत नाही अशा गोष्टी लोकांना करायला आवडतात. सोशल मीडियावर अशी अनेक प्रकरणे समोर येत असतात.

मराठी बातम्या/Viral/
Viral News : व्यक्तीला विचित्र व्यसन; दिवसभर घेतो वास आणि त्याचाच लावतो परफ्युम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल