ब्रेकअपनंतर एक मुलगी रडत रडत आपले लांबलचक केस कापणार होती. मात्र तेवढ्यात तिचा बॉयफ्रेंड मेसेज करतो आणि ती आनंदी होते. त्यानंतर ती केस कापण्याचा प्लॅन कॅन्सल करते. ती या सगळ्या घटनेचा व्हिडीओ बनवत होती जो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तरुणी ढसाढसा रडत आहे आणि तिच्या हातात कात्री आहे. ब्रेकअप झाल्यामुळे ती दुःखी आहे आणि तिचे लांबच लांब केस कापण्याचा निर्णय घेते. मात्र ती केस कापणार तेवढ्यात तिचा प्रियकर तिला मेसेज करतो. मग ती खूश होते आणि केस कापण्याचा प्लॅन रद्द करते. डोळे पुसत म्हणते ती म्हणते त्यानं मला मेसेज केलाय.
advertisement
हॅना स्टॉकिंग नावाच्या युजरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 3 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. त्याचबरोबर अनेकांनी यावर कमेंटही केल्या आहेत.
दरम्यान, सोशल मीडियावर प्रेम, ब्रेकअप यासंबंधित अनेक घटना समोर येत असतात. यामध्ये अनेक मजेशीर, विचित्र, धक्कादायक घटना पहायला मिळतात.
