एका प्रायव्हेट बँकेचा हा मॅनेजर. कंपनीच्या कर्मचाऱ्याने त्याच्याकडे आजारपणासाठी सुट्टी मागितली. त्याने व्हॉट्सअॅपवर मेसेज केला. यावर मॅनेजरने असा रिप्लाय केला की कर्मचाऱ्याने चॅटिंगचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर पोस्ट केले. रेडिटवर ही पोस्ट करण्यात आली आहे. अशा मॅनेजरचं मी काय करावं, असं कॅप्शन या पोस्टला दिलेलं आहे.
मुख्याध्यापकाच्या सहीचा चेक पाहून कॅशिअरला चक्कर
advertisement
रेडिट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेल्या या पोस्टमुळे भारतीय कार्यालयांमध्ये प्रचलित असलेल्या निर्दयी बॉस संस्कृतीबद्दल पुन्हा एकदा वादविवाद सुरू झाला आहे. ही कथा एका कर्मचाऱ्याची आहे जो गंभीर आजाराशी झुंजत होता, परंतु त्याची स्थिती समजून घेण्याऐवजी, त्याचा व्यवस्थापक त्याला "शिस्त" शिकवू लागला.
कर्मचाऱ्याने मॅनेजरला सांगितलं की तो वेदनादायक आरोग्य समस्येमुळे (कदाचित मूळव्याध किंवा फिस्टुला) ऑफिसमध्ये येऊ शकणार नाही. त्याने त्याच्या डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन देखील शेअर केलं जेणेकरून मॅनेजरला त्याची स्थिती चांगल्या प्रकारे समजू शकेल.
1974 साली नवऱ्याने काढलेले बायकोचे PHOTO, सोशल मीडियावर होतायेत VIRAL, असं काय आहे यात पाहा
त्या कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला मेसेज केला, "मी जास्त वेळ बसू किंवा उभा राहू शकत नाही. कृपया मला आजची मेडिकल लिव्ह द्या." ऑफिसमधून सुट्टी मिळण्याऐवजी, कर्मचाऱ्याला त्याच्या बॉसने फटकारलं. मॅनेजरने त्याला विचारलं, "तुला शिस्त कोणी शिकवली?" आणि पुढे म्हणाला, "बघ, तू कधी रजा मागतोस? यामुळे दोन्ही दिवसांचा पगार कापला जाईल."
त्यानंतर कर्मचाऱ्याने परिस्थितीबद्दल माफी मागितली आणि लिहिलं, 'सर, कृपया माझी परिस्थिती समजून घ्या, मी वैद्यकीय कारणांमुळे रजा मागत आहे.. माझ्या आरोग्याच्या समस्यांमुळे मी ऑफिसला येऊ शकत नाही याबद्दल तुम्हाला आधीच कळवलं नाही याबद्दल मी माफी मागतो.'
What should I do with this kind of Manageradvertisement
मॅनेजरचं उत्तर आणखी कठोर झालं. तो म्हणाला, "तुमचं काम कोण करेल? तुम्ही तुमची जबाबदारी आणि वचनबद्धता जितकी टाळाल तितक्या जास्त समस्या निर्माण होतील. तुम्ही पहिल्या 10 दिवसांतही तुमचं काम पूर्ण केलं नाही." कर्मचाऱ्याने शांतपणे उत्तर दिलं, "मी करेन, साहेब. मी माझ्या वचनबद्धतेपासून दूर जात नाही. मी ऑफिसमध्ये परतल्यावर सर्वकाही पूर्ण करेन."
या घटनेवर सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटल्या. अनेक युझर्सनी मॅनेजरच्या असभ्य वर्तनाचा निषेध केला, तर बहुतेकांनी मॅनेजरच्या इंग्रजीवर प्रश्न उपस्थित केलेत. त्याला इंग्रजी क्लास आणि नंतर मानवतेच्या वर्गात जाण्याचा सल्ला दिला. मॅनेजरने Discipline हा शब्द Decipline लिहिला आहे. एका युझरने 'तुम्हाला Decipline कोणी शिकवली?' आणि तो ब्रँच मॅनेजर आहे, व्वा, मला शब्दच सापडत नाहीत." असं म्हटलं आहे.
याआधी मुख्याध्यापकाच्या सहीच्या चेकमध्येही असाच गोंधळ पाहायला मिळाला. चेकवर 7,616 हा रकमेचा आकडा अक्षरात Seven Thursday Six Harendra Sixty Rupees Only ऐवजी Saven Thursday six Harendra sixty rupees only असा लिहिला होता.