मिठाचा ट्रेंड आहे डान्सिंग ट्रेंड. ज्यामध्ये एका वाटीला काळ्या पिशवीत गुंडाळलं जात आहे. त्यावर मीठ टाकलं जात आहे. मुलांना त्या वाटीसमोर मोठ्याने ओरडायला लावलं जात आहे. जितका आवाज तितकं हे मीठ हलतं. जणू काही मीठ नाचतानाच दिसतं म्हणून या ट्रेंडला डान्सिंग सॉल्ट ट्रेंड म्हटलं आहे.
काय आहे डान्सिंग सॉल्ट ट्रेंड
advertisement
आता हा ट्रेंड नक्की आहे तरी काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मुलांना साऊंड व्हायब्रेशन म्हणजे आवाजाचं कंपन समजावून सा्ंगण्याचा हा सोपा प्रयोग. जेव्हा ध्वनी लहरी एखाद्या पृष्ठभागावरून जातात तेव्हा ते कंपन निर्माण करतात. ते कशापद्धतीने हे या प्रयोगातून दिसून येतं.
व्हिडीओत तुम्ही पाहिल्यानुसार मुलं जशी ओरडतात तसं वाटीवर ठेवलेलं मीठ उडू लागतं. ध्वनीच्या कंपनामुळे हे होतं.
या ट्रेंडचा फायदा काय?
@sadhya_nagar26 इन्स्टाग्राम अकाऊंटवर दिलेल्या माहितीनुसार हा ट्रेंड मुलांच्या विकासासाठी फायद्याचा आहे. ध्वनी लहरी आणि कंपनाबाबत जाणून घेण्याची त्यांची उत्सुकता वाढते. ऑब्जर्व्हेशन स्किल विकसित होतात. मुलांना हे करण्यात मजाही येतं, तसंच मुलं या प्रयोगात बिझी राहतात.