चीनच्या गुइझोऊ प्रांतातील गुलू नावाचं एक छोटं गाव या कारणासाठी जगभर प्रसिद्ध आहे. दूरवर नजर टाकली तर ते एक साधं, शांत ग्रामीण गाव वाटतं हिरवेगार शेत, वळणावळणाचे रस्ते आणि उंचसखल डोंगर. पण जवळून पाहिलं तर इथलं दृश्य चकित करणारं आहे. येथील काही डोंगरांमधून दर काही दशकांनी अंड्यासारखे गुळगुळीत दगड बाहेर पडतात, जणू डोंगर स्वतः अंडे देत आहेत.
advertisement
स्थानिक लोक या दगडांना ‘अंड्याचे दगड’ म्हणतात आणि ते पिढ्यानपिढ्या या ठिकाणाला दैवी शक्तीचं स्थान मानतात. त्यांच्या मते, हे दगड फलनक्षमता आणि सुदैवाचे प्रतीक आहेत. आजही अनेक पर्यटक हे दृश्य पाहण्यासाठी गुलू गावात येतात.
पण वैज्ञानिकांनी आता या रहस्याचा उलगडा केला आहे. ‘जर्नल ऑफ जिओलॉजिकल रिसर्च’ मध्ये प्रकाशित संशोधनानुसार, ही घटना पूर्णपणे भूवैज्ञानिक (geological) आहे, कोणत्याही चमत्काराशी तिचा संबंध नाही.
सोर्स : सोशल मीडिया
संशोधक सांगतात की या ‘अंडे देणाऱ्या चट्टानां’च्या आत कॅल्शियम कार्बोनेटसारखे खनिज वर्षानुवर्षे हळूहळू साचत जातात. लाखो वर्षांनंतर पाण्याचा दाब, तापमान आणि रासायनिक प्रक्रिया यांच्या परिणामाने हे खनिज कठीण दगडांच्या रूपात तयार होतात. जेव्हा वरची माती आणि खडक झिजतात, तेव्हा आतले गुळगुळीत दगड बाहेर दिसू लागतात आणि असं वाटतं की जणू डोंगर अंडे देतोय.
या प्रक्रियेला वैज्ञानिक भाषेत ‘कंक्रीशन’ (Concretion) असं म्हणतात. म्हणजेच मऊ दगडांच्या आत खनिजांच्या थरांनी तयार झालेला कठीण गोलाकार दगड. गुलू गावात दर 20 ते 30 वर्षांनी असे दगड तयार होतात, आणि त्यामुळे हा भाग आजही पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.
स्थानिक गाईड्स हे दृश्य अधिक रोमांचक बनवतात काही लोककथा, काही दैवी कहाण्या सांगतात पण खरं तर हे निसर्गाने घडवलेलं एक असामान्य चमत्कारिक भूवैज्ञानिक कोडं आहे.
