सिंह-सिंहणींच्या हल्ल्याविषयी तर बोलायलाच नको. अचानक हे प्राणी समोर आले किंवा तुमचा रस्ता अडवला तर काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही. असंच काहीसं दृश्य समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पहायला मिळतंय. व्हिडीओ पाहून तुम्हालाही घाम फुटल्याशिवाय राहणार नाही.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सिंह आणि सिंहिणींचा एक गट रस्त्यावर फिरत आहे. अनेक वाहने त्यांच्यामुळे थांबली आहेत. सर्व लोकांनी वाहने लॉक केली आहेत आणि सर्वजण गाड्यांमध्ये लपले आहेत. या कारमध्ये बसलेल्या लोकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. हे दृश्य पाहिल्यावर कोणालाही धक्का बसेल, कोणीही घाबरेल.
advertisement
@AMAZlNGNATURE नावाच्या X अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 15 सेकंदांचा हा व्हिडीओ खूप खतरनाक असून चांगलाच व्हायरल होतोय. व्हिडीओवर अनेक कमेंटही येताना दिसत आहे. जंगल सफारीवर गेल्यावर लोक त्यांना पाहण्यासाठी पैसे भरतात तुम्ही फ्रीमध्ये बघून घ्या, अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. अनेकांनी गाड्या व्यवस्थित लॉक करण्याचा सल्ला दिला. प्राण्यांचे असे भयानक, खतरनाक व्हिडीओ समोर येत असतात.
