अर्थ कॉर्पोरेशन असं कंपनीचं नाव असून ती पेस्टिसाइड इंडस्ट्रीत काम करते. ही कंपनी जपानमधील इंडस्ट्री खूप प्रसिद्ध आहे आणि पहिल्या क्रमांकावर आहे. ही पेस्टिसाइड कंपनी दरवर्षी एकदा मंदिरात कार्यक्रम आयोजित करते. यामध्ये त्यांच्या हातून मरण पावलेल्यांच्या आत्म्यांना शांती मिळावी यासाठी प्रार्थना केली जाते. खरं तर ऐकायला ही एक खूपच विचित्र घटना आहे. पण असंच खरंच केलं जातं. या मागची कारणं काय आहेत, ते जाणून घेऊयात.
advertisement
कुत्रा शिकवतोय चिमुकल्याला रांगायला, क्युट Video होतोय तुफान व्हायरल
कीटकांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना
अर्थ कॉर्पोरेशनचं म्हणणं आहे की त्यांच्या सर्वोत्तम प्रॉडक्ट्सच्या रिसर्चदरम्यान ते अशा कीटकांना तयार करतात, मग ते या कीटकांवर पेस्टिसाइडचा वापर करतात. अशा प्रयोगांमध्ये कीटकांना जीव गमवावा लागतो. अगदी लहान प्राण्यांचे बलिदान महत्त्वाचे असल्यामुळे कंपनीच्या वतीने आको शहरातील मायोडोजी मंदिरात कीटकांच्या सन्मानार्थ प्रार्थना ठेवली जाते. कंपनीचे कर्मचारी या सभेत सहभागी होतात आणि एक पुजारी प्रार्थना करतो. एवढंच नाही तर मृत कीटकांचे डझनभर फोटोही या वेळी ठेवण्यात येतात, ज्यात डास, माश्या, झुरळं आणि टिक्स यांचा समावेश आहे.
कीटक मारण्यासाठी तयार केले जातात कीटक
कंपनीच्या संवेदनशीलतेबद्दल विचार करण्यापूर्वी एक महत्त्वाची माहिती आम्ही तुम्हाला देतो. ती माहिती अशी की कंपनी दरवर्षी 10 लाख झुरळं आणि विशेषत: संशोधनादरम्यान त्यांना मारण्यासाठी एक कोटीपेक्षा जास्त टिक्स यांची निर्मिती करते. शेवटी त्यांना मानवांचे जीवन सुखकर करण्यासाठी संशोधनादरम्यान मारले जातात. अर्थ फार्मास्युटिकल रिसर्चचे चीफ तोमिहिरो कोबोरी म्हणतात की अशा प्रकारे कीटकांच्या बलिदानाचा आदर केला जातो. या कार्यक्रमात त्यांचे फोटो ठेवून त्यांच्या मृत्युबद्दल शोक व्यक्त केला जातो. यामुळे त्या कीटकांच्या आत्म्याला शांती मिळते असं मानलं जातं.
