कुत्रा शिकवतोय चिमुकल्याला रांगायला, क्युट Video होतोय तुफान व्हायरल
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
प्रत्येकाच्या घरी वेगवेगळे पाळीव प्राणी असतात. पाळीव प्राण्यांना जीव लावल्यावर तेही आपल्यावर प्रेम करतात, प्रामाणिक राहतात, काळजी दाखवतात. खास करुन कुत्रा. हा पाळीव प्राण्यांमध्ये सर्वात जास्त प्रामाणिक आणि प्रेमळ प्राणी आहे.
नवी दिल्ली : प्रत्येकाच्या घरी वेगवेगळे पाळीव प्राणी असतात. पाळीव प्राण्यांना जीव लावल्यावर तेही आपल्यावर प्रेम करतात, प्रामाणिक राहतात, काळजी दाखवतात. खास करुन कुत्रा. हा पाळीव प्राण्यांमध्ये सर्वात जास्त प्रामाणिक आणि प्रेमळ प्राणी आहे. त्याला योग्य प्रकारे ट्रेन केलं तर तो अनेक गोष्टी करु शकतो. सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ समोर येत असतात.
अशातच एका कुत्र्याचा क्युट व्हिडीओ समोर आलाय. हा लहान कुत्रा एका चिमुकल्याला चक्क रांगायला शिकवतोय. हा क्युट व्हिडीओ पाहून तुम्हीही त्या कुत्र्याचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
कुत्र्याचा आणि चिमुकल्याच्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक लहान मुल खेळत आहे. ते रांगण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्या समोर कुत्रा असून तो या लहान मुलाला रांगायला शिकवताना दिसत आहे. लहान चिमुकल्यासोबत कुत्राही रांगतोय. कुत्र्याचा हा अंदाज पाहून नेटकरी त्याच्यावर फिदा झालेत. त्यांचं भरभरुन कौतुक करत आहेत.
advertisement
Dog teaches a baby how to crawl..☺️ pic.twitter.com/YS4cNDQo3n
— o̴g̴ (@Yoda4ever) January 4, 2024
@Yoda4ever नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 22 सेकंदांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडीओवर भरपूर कमेंट येताना दिसतायेत. पाळीव प्राण्यांचे असे प्रेमळ, क्युट असे अनेक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत असतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 05, 2024 12:19 PM IST







