आजकाल सोशल मीडियावर reels, व्हिडीओ बघायला हजारो लोक येतात. यामुळे मनोरंजन तर होतंच, पण अनेकदा अनपेक्षित घटना डोळ्यांसमोर घडतात. अशाच एका रस्त्यावरच्या थरारक रेसचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरतोय.
दोन रिक्षांची ‘Fast & Furious’ स्टाईल रेस
व्हिडीओमध्ये दोन रिक्षा एका रस्त्यावर भरधाव वेगाने चालताना दिसतात. पाहता पाहता दोघांमध्ये जणू काही ‘रेस’ सुरू झाल्यासारखं वाटतं. पुढे अचानक एक तीव्र वळण येतं. एक चालक शहाणपण दाखवत वेग कमी करतो. पण दुसरा? त्याला वाटतं आता हीच वेळ आहे 'हिरो' होण्याची! तो वेग वाढवतो… आणि इथंच होते चुक.
advertisement
'इक मोड आया' आणि रिक्षा पलटी होते
वेगात वळण घेण्याच्या नादात रिक्षा पूर्णपणे अनियंत्रित होते आणि थेट पलटी खाते. रिक्षामधील प्रवासी आणि चालक थेट रस्त्यावर आपटतात. पाहणाऱ्यांचा हृदयाचा ठोका क्षणभर थांबतो. पण त्याला जिवंत असल्याचं पाहून जीवात जीव येईल आणि हे सगळं पाहून थोडं हसूही येईल.
सुदैवानं रस्त्याच्या कडेला दरी नव्हती आणि मोठा अपघात टळला. पण रिक्षामधील लोकांना किरकोळ मार बसलेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हा व्हिडीओ @KreatelyMedia या एक्स प्लॅटफॉर्मवरील अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओसोबत कॅप्शन दिलं होतं – “Fast & Furious – बांग्लादेशी वर्जन”.
हा व्हिडीओ बांगलादेशमधील असल्याचं मानलं जातंय. मात्र तो नेमका कुठे आणि केव्हा शूट झाला, याची स्पष्ट माहिती अद्याप समोर आलेली नाही.
या व्हिडीओवर नेटिझन्सनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.