व्हिडिओत नेमका काय दावा?
व्हिडिओमध्ये महिलेने चित्रांच्या स्लाइड शोसह माहिती दिली आहे. व्हिडिओवर लिहिले आहे की तिची मुलगी सर्व 32 दात घेवून जन्माला आली आहे. आणि या स्थितीबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने ती हा व्हिडिओ बनवत आहे. या व्हिडिओवर लोकांनी खूप कमेंट्सही केल्या आहेत. काहींना मुलीचे हसणे खूप आवडले तर काहींना ती मुलगी गुढ वाटली.
advertisement
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये अनेकांनी याला गांभीर्याने घेण्याचा आग्रह धरला असून हा विनोद नसल्याचे म्हटले आहे. काही लोकांनी आईबद्दल सहानुभूती व्यक्त करण्याचाही प्रयत्न केला आहे. एका वापरकर्त्याने असेही म्हटले की याला स्टीव्ह हार्वे कंडिशन म्हणतात. इन्स्टाग्रामवर nika.diwa अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 2.96 कोटी लोकांनी पाहिले आहे.या व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून देखील सातत्याने प्रतिक्रिया येत आहेत.
अशी घ्यावी लागते बालकांची काळजी: या स्थितीला अनेक नावांनी संबोधले जात असले तरी, सामान्य नाव म्हणजे जन्मजात दात किंवा बाळाचे दात. याची अनेक कारणे असू शकतात. सुरुवातीला नवजात बाळाला याचा कोणताही त्रास होत नाही, परंतु त्यामुळे आईला बाळाला दूध पाजण्यात अडचणी येतात. त्याच वेळी, मुल स्वतः देखील तुटलेला दात गिळू शकतो.
