अवाढव्य हत्तीला नेण्यासाठी एका छोट्या हत्तीचा म्हणजेच टेम्पोचा वापर करण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय. हे दृश्य पाहून तुम्हीही थक्क व्हाल. हा व्हिडीओ काहीच वेळात इंटरनेटवर व्हायरल झाला आणि चर्चेचा विषय ठरत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्यावर एक छोटा टेम्पो वेगानं धावत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या टेम्पोवर मोठा हत्ती उभा करण्यात आला आहे. एवढ्या भल्यामोठ्या हत्तीसमोर हा टेम्पो अगदी लहान वाटत आहे. हा व्हिडीओ नेमका कोणत्या ठिकाणचा आहे आणि कितपत खरा आहे याविषयी माहिती नाही. मात्र सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगानं व्हायरल होतोय.
advertisement
jani_saab_0288 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर भरपूर कमेंट येत असून अनेकांनी व्हिडीओला शेअर केलं आहे. अनेकांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. असे मजेशीर, विचित्र व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.
