हॉटेलमधील स्वयंपाक घरातील एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर खळबळ उडवत आहे. व्हिडीओतील स्वयंपाक घरातील अवस्था पाहून तुम्हाला किळस, उलटी आल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडीओ पाहून लोकांनी संताप व्यक्त केलाय.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती कढईत पुरी तळत आहे. तो त्याच्या कामात मग्न आहे पण कॅमेरा दुसरीकडे सरकताच तुम्हाला स्वयंपाकघरात मोठमोठे उंदीर आरामात फिरताना दिसतील. ज्या भांड्यात पुरीचे पीठ ठेवले होते त्याच भांड्यात एक उंदीर पीठ खात होता. तेथे उपस्थित कोणाला काही फरक पडत नाही आणि या घाणीत अन्न तयार केलं जात आहे.
advertisement
@chiragbarjatyaa नावाच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 16 सेकंदांचा हा किळसवाणा व्हिडीओ पाहून तुम्हाला परत कुठे बाहेर खाण्याची इच्छा होणार नाही. व्हिडीओवर अनेक कमेंट येत असून लोक संताप व्यक्त करत आहेत. हा व्हिडीओ नेमका कोणत्या ठिकाणचा आहे हे स्पष्ट झालं नाही मात्र सध्या इंटरनेटर या व्हिडीओनं खळबळ उडवली आहे.