फेमी आणि नील गेहरल्स स्विफ्ट वेधशाळेने 9 ऑक्टोबर 2022 रोजी हा स्फोट पाहिला. त्याचं निरीक्षण केलं. संशोधकांनी याला GRB 221009A असं नाव दिलं. नासाच्या फर्मी गामा-रे स्पेस टेलिस्कोपने केलेल्या शोधाच्या आधारे, तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की हा पदार्थ आणि प्रतिद्रव्य कण प्रकाशाच्या 99.9 टक्के वेगाने नष्ट झाल्याचा परिणाम असू शकतो. स्पेस रिपोर्ट्सनुसार, त्याचा शोध लागल्यानंतर लगेचच त्याला ब्राइटेस्ट ऑफ ऑल टाइम किंवा BOAT असं नाव देण्यात आलं.
advertisement
बापरे! भारताच्या वर आकाशात हे काय दिसलं? NASA ने दाखवलेला पृथ्वीचा Video पाहून संपूर्ण जगाला धडकी
BOAT चा शोध लावणाऱ्यांपैकी एक संशोधक आणि भौतिकशास्त्र, खगोलशास्त्राचे प्राध्यापक, नॉर्थवेस्टर्नमधील फोंग ग्रुपचे नेते वेन फाई फोंग यांनी सांगितलं, जोपर्यंत आम्ही GRB शोधण्यात सक्षम आहोत, तोपर्यंत हा आतापर्यंतचा सर्वात तेजस्वी GRB आहे यात शंका नाही.
काय आहे या स्फोटाचं कारण?
तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की BOAT चं कारण हा सुपरनोव्हा स्फोट आहे. त्यानंतर ब्लॅक होलची निर्मिती होण्याची शक्यता आहे. रेडबॉड विद्यापीठाच्या संशोधन प्रमुख मारिया एडविज रॅवसिओ यांनी एका निवेदनात म्हटलं आहे. BOAT च्या विस्फोटामनंतर काही मिनिटांनी फर्मीच्या गामा-रे बर्स्ट मॉनिटरने एक असामान्य ऊर्जा शिखर रेकॉर्ड केलं आहे. ज्याने आमचं लक्ष वेधून घेतलं. जेव्हा मी पहिल्यांदा तो सिग्नल पाहिला तेव्हा माझ्याही अंगावर काटा आला. आमच्या विश्लेषणात असं दिसून आले आहे की जीआरबीचा अभ्यास करताना 50 वर्षांमध्ये पाहिलेली ही पहिली उच्च-विश्वसनीय उत्सर्जन रेषा आहे.
आतून उलटी फिरतेय पृथ्वी, वेगही घटला; याचा काय होणार परिणाम?
इथं पाहा VIDEO
नासाने याचा व्हिडीओही शेअर केला आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा. NASA च्या गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटरमधील फर्मी प्रकल्प शास्त्रज्ञ आणि टिमच्या सदस्य एलिझाबेथ हेस म्हणाल्या, " ब्रह्मांडातील या अविश्वसनीय स्फोटांचा अनेक दशकं अभ्यास केल्यानंतर आम्हाला अजूनही हे जेट्स कसं कार्य करतात हे समजत नाही. अशा पद्धतीने पुरावे मिळणं उल्लेखनीय आहे.
