गंगानगर इथं राहणारी विशाल सिंघल नावाची ही व्यक्ती. त्याचे वडील मुकेश एक सामान्य फोटो स्टुडिओ चालवत होते. कुटुंबाचं मासिक उत्पन्न सुमारे 25000 रुपये होते. पण अचानक काही वर्षांतच त्यांच्या नावावर 64 विमा पॉलिसी जारी करण्यात आल्या, ज्या एकूण 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त होत्या. 2018 ते 2023 दरम्यान, मुकेशला कोट्यवधी रुपयांच्या पॉलिसी जारी करण्यात आल्या. या व्यतिरिक्त 2024 मध्ये टोयोटा लेजेंडर, निसान मॅग्नाइट, ब्रेझा आणि रॉयल एनफील्डसारख्या लक्झरी गाड्यादेखील कर्जावर खरेदी करण्यात आल्या. यामुळे विमा कंपन्यांना संशय आला.
advertisement
10,00,00,000 रुपयांची सर्जरी! रुग्ण नाही हॉस्पिटल रुग्णाला देणार इतके पैसे, पण का?
या घरात पहिला मृत्यू 2017 मध्ये झाला. घराची मालकीण प्रभा देवी मुलगा विशालसोबत दुचाकीवरून जात होती. तिला अचानक एका अज्ञात वाहनाने धडक दिली आणि त्या अपघातात तिचा मृत्यू झाला. लोकांनी या पहिल्या मृत्यूला दुर्दैव मानलं आणि ते विसरले. 5 वर्षांनंतर 2022 मध्ये कुटुंबासोबत पुन्हा एकदा दुःखद घटना घडली. यावेळी विशालची पत्नी एकताचं अचानक निधन झालं. तिला हृदयविकाराचा झटका आला आणि तिचा मृत्यू झाला. आता घरात फक्त वडील आणि मुलगा उरले होते. पण मार्च 2024 मध्ये आणखी एक दुःखद घटना घडली. विशालचे वडील मुकेशचंही रस्ते अपघातात निधन झालं.
आतापर्यंत हे तिन्ही मृत्यू नशिबाने घडलेले मानले जात होते. पण खरं सत्य तेव्हा समोर आलं जेव्हा विशालने त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर विमा दावा दाखल केला. हा दावा एकूण 39 कोटी रुपयांचा होता. ही रक्कम एकाच पॉलिसीमधून नाही तर 60 वेगवेगळ्या विमा पॉलिसींमधून मागितली गेली होती. हे ऐकून विमा कंपनीचे अधिकारी थक्क झाले.
विशालची चौथी पत्नी जिच्याशी त्याने फेब्रुवारी 2024 मध्ये लग्न केलं, तिने केसचा मार्ग बदलला. तिने खुलासा केला की लग्नानंतर तिला कळलं की विशालने अनेक लग्ने केली आहेत आणि ती त्याची चौथी पत्नी आहे. तिने खुलासा केला की विशालने तिला सांगितलं होतं की त्याच्या वडिलांना कॅन्सर आहे आणि काही दिवसांतच ते मरेतील. विशालने त्याच्या वडिलांच्या नावावर 3 कोटी रुपये किमतीची विमा पॉलिसी काढली होती. त्याने वडिलांच्या मृत्यूसाठी मदत करण्यास सांगितलं, पण तिने नकार दिला तेव्हा त्याने तिच्यावर हल्ला केला. त्याने तिचा पाठीचा कणा मोडण्याचा प्रयत्नही केला. सुदैवाने तिने माहरेच्यांच्या मदतीने कसाबसा आपला जीव वाचवला.
विमा कंपन्यांना 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांची फसवणूक करण्याचा कट रचणाऱ्या पुरूषाने आपल्या पत्नी, आई आणि वडिलांची हत्या केली. त्याची पुढची बळी त्याची चौथी पत्नी होती. पण तिच्या हुशारीमुळे ती वाचली.
एक लोकप्रिय नेता; पण त्याने आयुष्यात कधीच दात घासले नाही, टॉयलेटमध्ये गेला नाही, अंघोळीचाही कंटाळा
तिने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून या घटनेची तक्रार केली. तिने मेरठच्या एसएसपीकडेही अनेक वेळा अपील केलं, पण प्रत्येक वेळी कौटुंबिक बाब म्हणून तिला काढून टाकण्यात आलं. पण जेव्हा विमा कंपनीने एसएसपी आणि डीआयजीला या प्रकरणाची माहिती दिली आणि संभलच्या एएसपीशी बोलले तेव्हा सखोल चौकशीत सत्य उघड झाले. 18 डिसेंबर 2024 रोजी आठ वेगवेगळ्या विमा कंपन्यांनी मेरठच्या एसएसपीला पत्र पाठवलं तेव्हा हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. त्यांनी सांगितलं की विशालने त्याच्या वडिलांच्या नावाने 70 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या पॉलिसी काढल्या होत्या आणि तो संशयास्पद परिस्थितीत दावे दाखल करत होता. कंपन्यांच्या अंतर्गत तपासणीत असा निष्कर्ष काढला गेला की ही एक पद्धतशीर फसवणूक होती.
संभल जिल्ह्याच्या एएसपी अनुकृती शर्मा यांना जेव्हा विमा कंपनीने माहिती दिली तेव्हा त्यांनी सखोल चौकशी सुरू केली. मृताचे वैद्यकीय अहवाल आणि विमा कागदपत्रे तपासण्यात आली. हापूर आणि मेरठमधील पोलीस फाईल्स मागवण्यात आल्या आणि संशयास्पद दाव्यांची यादी तयार करण्यात आली. आरोपीला अटक केल्यानंतर आणि कठोर चौकशी केल्यानंतर विशालने अखेर त्याची पत्नी, आई आणि वडिलांच्या हत्येची कबुली दिली. त्याने पत्नी आणि वडिलांचा गळा दाबून खून केला आणि आईच्या डोक्यावर जड वस्तूने वार करून तिची हत्या केल्याचं सांगितलं. विशालचा सहकारी सतीश कुमार जो मेरठमध्ये महिला टेलरिंग शॉपचा मालक आहे, तो देखील या हत्येत सहभागी होता. दोघांनी विमा कंपन्यांना फसवण्याचा कट रचला होता. दोघंही आता तुरुंगात आहेत.