अग्गंबाई सासूबाई! 35 वर्षीय बॉयफ्रेंडसोबत पळाली, जाता जाता सुनांचं आयुष्य उद्ध्वस्त; हैराण करणारी Love Story

Last Updated:

Mother in law affaire : अडीच वर्षांपूर्वी एका वीटभट्टीवर काम करत असताना त्यांची भेट झाली. त्यांचं फोनवर बोलणं, गुपचूप भेटणं सुरू झालं. नंतर असं काही घडलं ज्याचा कुणी स्वप्नातही विचार केला नव्हता.

News18
News18
लखनऊ : प्रेम कधी कुठे कसं कुणावर होईल सांगू शकत नाही. प्रेमाला वय नसतं असं म्हणतात. असंच एक प्रेम प्रकरण चर्चेत आलं आहे. ज्यात चक्क दोन नातवांची आजी एका तरुणाच्या प्रेमात पडली. त्याच्यासोबत तिनं संपूर्ण कुटुंबाला सोडलं. सासूच्या अफेअरमुळे सुनेचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. उत्तर प्रदेशातील ही घटना आहे.
झाशी जिल्ह्यातील मौरानीपूर इथलं सुखवती आणि कामता प्रसाद हे कपल. त्यांची दोन मुलं, दोघांचंही लग्न झालेलं. दोन सुना, 2 नातवंडं. असं हे आनंदी कुटुंब. कुटुंब मजुरी करत होतं, पण त्यांचा संसार सुखाने चालू होता. पण नंतर असं काही घडलं ज्याचा कुणी स्वप्नातही विचार केला नव्हता.
अडीच वर्षांपूर्वी भिंड जिल्ह्यातील एका वीटभट्टीवर काम करत असताना सुखवती रथ तहसीलमधील बिहुनी गावातील रहिवासी अमर सिंग प्रजापतीला भेटली. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांचं फोनवर बोलणं, गुपचूप भेटणं सुरू झालं.
advertisement
वीटभट्टी कामगार असलेला सुखवतीचा नवरा कामता प्रसादला पत्नीच्या अफेअरबाबत समजलं होतं. तो म्हणाला, पत्नी सुखवतीसोबत त्याचं आयुष्य सुरळीत चाललं होतं. दोन मुलांसह, त्यांच्या पत्नी आणि चार नातवंडांसह आनंदाने राहत होते. पण अडीच वर्षांपूर्वी तीअमर सिंह प्रजापतीला भेटली. नंतर दोघंही गुप्तपणे भेटू लागले. कामताने तिला वारंवार समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण सुखवती काही ऐकली नाही.
advertisement
अलीकडेच जेव्हा कामता आपल्या मुलाच्या उपचारासाठी झाशीला गेला तेव्हा सुखवतीने संधी साधली आणि घरातील सुनेचे दागिने, रोख रक्कम आणि इतर सामान घेऊन ती अमर सिंहसह पळून गेली. जाताना तिने सुनांचे दागिने आणि सुमारे 40000 रुपये रोख रक्कमही नेली जी तिच्या सुनेसाठी ठेवण्यात आली होती.
advertisement
कामता प्रसाद, त्याचा मुलगा, सून आणि नातवंडांसह मौरानीपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचला.
पोलीस ठाण्यात रडत कामता म्हणाला, "ती एवढं टोकाचं पाऊल उचलेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. आमची नातवंडे असह्य आहेत. सुनांचे दागिने हे त्यांचे अलंकार होते आणि त्यांच्या प्रसूतीसाठी 40 हजार रुपये वाचवले होते. आता आपण काय करणार?"
advertisement
कुटुंबासह पोलीस ठाण्यात आलेल्या मुलाने आणि सुनेनी सुखवतीवर विश्वासघाताचा आरोपही केला. मुलगा म्हणाला, "आईच्या कृतीने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. आम्ही मजूर म्हणून काम करून आपला उदरनिर्वाह करतो. आता हा धक्का कसा सहन करायचा?"
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे आणि तपास सुरू केला आहे. मौरानीपूर पोलिस स्टेशनच्या प्रभारींनी सांगितलं की, कामता प्रसादच्या तक्रारीवरून अमर सिंगविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 406 (गुन्हेगारी विश्वासघात) आणि 420 (फसवणूक) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सुखवतीला सह-आरोपी करण्यात आलं आहे. भिंड, मोरेना आणि आसपासच्या भागात पोलीस पथकं छापे टाकत आहेत. अमर सिंगच्या बिहुनी गावातही तपास सुरू आहे. प्रकरण संवेदनशील आहे. दोघांनाही लवकरच अटक केली जाईल. कुटुंबाला न्याय मिळेल.
view comments
मराठी बातम्या/Viral/
अग्गंबाई सासूबाई! 35 वर्षीय बॉयफ्रेंडसोबत पळाली, जाता जाता सुनांचं आयुष्य उद्ध्वस्त; हैराण करणारी Love Story
Next Article
advertisement
BJP vs Shiv Sena Ambernath : भाजपचा डाव फसला, शिंदे गटाचा मास्टरस्ट्रोक, अंबरनाथ नगर परिषदेत मोठी उलथापालथ, सगळा गेमच फिरला!
भाजपचा डाव फसला, शिंदे गटाचा मास्टरस्ट्रोक, गेमच फिरला अंबरनाथमध्ये उलथापाल
  • अंबरनाथ नगरपरिषदेच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे.

  • शिवसेना शिंदे गटाची अंबरनाथमधून सत्ता उलथवण्यासाठी भाजपने जंग पछाडलं.

  • शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मास्टरस्ट्रोकमुळे भाजप पुरता घायाळ

View All
advertisement