हो, म्हणजे रस्त्यावर दोन टु-व्हिलरमध्ये असं काही घडलं की ते पाहून त्यांचातील ते रोमान्स असल्याचंच म्हणावं लागेल. यात भरीसभर म्हणजे व्हिडीओच्या बॅकग्राउंडला सयाराचं गाणं वाजत आहे, जे या व्हिडीओतील परिस्थीतीला एकदम साजेशी आहे. जी एखाद्या सिनेमातील असल्याचं भासत आहे.
भररस्त्यात दोन गाड्यांच्या रोमान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. या व्हिडीओची चर्चा होत असतानाच एक मोठी माहिती समोर आली आहे. हा व्हिडीओ भारतातला नसल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हिडीओ जयपूर किंवा राजस्थानमधील नाही तर परदेशातील आहे. ही दृश्ये इंडोनेशियाच्या रियाउ प्रांतातील आहेत आणि त्यांचा जयपूर किंवा राजस्थानशी कोणताही संबंध नाही.
advertisement
आता एवढं म्हटल्यानंतर तुमच्या मनात देखील उत्सुकता आली असेल की दोन बाईक रोमान्स करतायत म्हणजे नक्की असं काय करतायत?
खरंतर रस्त्यावर एक स्कूटी आणि एक बाईक अशा दोन्ही गाड्या एकमेकांमध्ये अडकल्या आणि हे घडताना गाड्या चालू होत्या त्यामुळे त्या गोलगोल फिरु लागल्या आणि सोबत असलेल्या गाडीला घेऊन ते फिरतच राहिले. त्यांचं हे गोलगोल फिरणं थांबतच नव्हत. ज्यामुळे रस्त्यावरील सगळ्या लोकांना थांबावं लागलं, जेणे करुन कोणताही अपघात घडू नये. दरम्यान दोन्ही गाड्यांचे मालक आणि काही लोक मिळून या दोन्ही गाड्यांना एकमेकांपासून वेगळं करणंसाठी आणि थांबवण्यासाठी प्रयत्न करत होते. पण त्यांना ही ते शक्य होत नव्हते. अखेर थोड्यावेळानंतर एकानं एक लाकडी बांबूचा वापर करुन कसबस त्या गाड्यांना वेगळं केलं ज्यानंतर त्यांचं फिरणं थांबलं.
त्यावेळी तिथे जमलेल्या अनेकांनी हा आगळा वेगळा प्रकार आपल्या फोनमध्ये कैद केला आणि मग हा व्हिडीओ तेथील एकाने आपल्या सोशल मीडियावर शेअर केला, जो काहीवेळातच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.
अनेक नेटीझन्सनी कमेंट्समध्येही भन्नाट प्रतिक्रिया दिल्या एकानं लिहिलं “ही खरी टू-व्हीलर लव्ह स्टोरी आहे”, तर दुसऱ्यानं लिहिलं “रोमियो-ज्युलिएटलाही लाजवेल असं दृश्य”, तर एकानं लिहिलं “यांना ट्रॅफिक पोलिसांनी वेगळं करायला नको का?” गाड्यांचा हा “रोमँटिक डान्स” इतका मस्त जमला की लोक मिनिटभर तरी नजर हटवू शकले नाहीत.