तुम्ही गाजर हलवा, भोपळा हलवा खाल्ला असेल मात्र कधी बिस्किट हल्ला ऐकलाय किंवा खाल्लाय का? हे ऐकून कदाचित काहींना विचित्र वाटू शकतं मात्र एका महिलेनं बिस्किट हलवा बनवला असून सध्या सोशल मीडियावर बिस्किट हलव्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, महिलेनं एका पॅनमध्ये बिस्किटांची दोन पॅकेट ठेवली आहेत. त्यानंतर त्यात दूध घालून घट्ट पेस्ट होईपर्यंत मिक्स केलं. यानंतर त्यांनी एक छोटी वाटी साखर घालून त्यात दोन चमचे तूप टाकलं आणि वर ड्रायफ्रूट्स आणि खोबरे घालून हा अनोखा हलवा तयार केला. लहानपणीच्या आवडत्या लिटिल हार्ट्स आणि पार्ले-जी बिस्किटांच्या मदतीने महिलेनं ही डिश तयार केली. व्हिडीओ शेअर करत महिलेनं म्हटलं की, तिच्या सासऱ्यांना ही डिश खूप आवडायची आणि ती त्यांच्या आठवणीत हे बनवत असते.
advertisement
@desimojito नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर भरपूर कमेंटही येताना दिसत आहे. 31 सेकंदांचा हा व्हिडीओ पाहून अनेक लोकांच्या कमेंट व्हिडीओवर पहायला मिळतायेत. अनेकांनी याला विचित्र म्हटलं तर काहींनी म्हटलं की तिला अजूनही समजलं नाही की सासरे का नाहीत ते. अशा निरनिराळ्या कमेंट व्हिडीओवर येताना दिसतायेत.
