TRENDING:

रक्तरंजित लढाई, समुद्रातच होतो हा भयावह खेळ; ज्यामध्ये अनेकांचा जातो जीव

Last Updated:

समुद्रात अनेक सागरी जीव राहतात. अनेक लोक क्रूरपणे त्यांना मारुन टाकतात. त्यामुळे अनेक ठिकाणी समुद्री जीव मारण्यावर बंदी करण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : समुद्रात अनेक सागरी जीव राहतात. अनेक लोक क्रूरपणे त्यांना मारुन टाकतात. त्यामुळे अनेक ठिकाणी समुद्री जीव मारण्यावर बंदी करण्यात आली आहे. मात्र असा एक देश आहे जिथे दरवरर्षी अनेक डॉल्फिन मारल्या जातात. पूर्ण समुद्रातील पाणी लाल होतं. आणि चकित करणारी गोष्ट म्हणजे या डॉल्फिनला निर्दयीपणे मारल्यावर सरकारही काहीच बोलत नाही. हा देश नेमका कोणता आहे आणि तेथे या गोष्टींना परवानगी कशी काय? याविषयी जाणून घेऊया.
समुद्रातच होतो हा भयावह खेळ
समुद्रातच होतो हा भयावह खेळ
advertisement

दरवर्षी 16000 समुद्री प्राणी मारण्यासाठी जपानच्या सरकारने तेथील मच्छीमारांना परवानगी दिली आहे. त्यामुळे वर्षात हजारे डॉल्फिन मारल्या जातात. याची सुरुवात तटीय शहरापासून झाली.

मोठं संकट येणार; या ठिकाणी जमिनीतून निघत आहे बुडबुडे, लोकांचा उडाला थरकाप!

अमेरिकेतील चैरिटी डॉल्फिन प्रोजेक्टनं याविषयी म्हटलं, मच्छीमारांना आपलं काम आणखी चांगलं आणि कलात्मक करता यावं यासाठी ते डॉल्फिन मारु शकतात. मात्र या गंभीर गोष्टीमुळे संपूर्ण समुद्रच लाल होतो. हे कसं काम करतं याविषयीही त्यांनी सांगितलं.

advertisement

मच्छीमार आपल्या होड्यांच्या खाली स्टेनलेस स्टीलचे खांब लावतात. त्या स्टीलच्या खांबांवर ते सतत हतोड्यानं वार करत राहतता. यामुळे मोठा आवाज समुद्रात होतो. या आवाजामुळे डॉल्फिनला समुद्राचं पाणी आणि आवाज यांच्यामध्ये अडकल्याचं वाटतं.

मोठ्या आवाजापासून वाचण्यासाठी डॉल्फिन दुसऱ्या दिशेने पळतात. असं करत मच्छीमार डॉल्फिनला ताईजी बंदरगाह पर्यंत घेऊन जातात. एवढ्या वेळात डॉल्फिन थकून जातात. ती संधी साधत मच्छीमार त्यांच्या मागे खिळा ठोकतात. ज्यामुळे त्यांचं हाड तुटतं आणि ते मरतात. ही गोष्ट करताना अनेक डॉल्फिन मरतात आणि समुद्र रक्तानं भरतो. असं वाटतं की एखादी रक्तरंजित लढाई या ठिकाणी झाली आहे.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
रक्तरंजित लढाई, समुद्रातच होतो हा भयावह खेळ; ज्यामध्ये अनेकांचा जातो जीव
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल