मोठं संकट येणार; या ठिकाणी जमिनीतून निघत आहे बुडबुडे, लोकांचा उडाला थरकाप!

Last Updated:

जग आता संपणार आहे, पृथ्वीचा नाश होणार आहे, अशा अनेक बातम्या वारंवार कानी पडतात. मात्र यातील अर्ध्या तर अफवा आणि दावे केलेले असतात. आत्तापर्यंत अशा केलेल्या अनेक भविष्यवाणी खोट्या ठरल्या आहेत.

 जमिनीतून निघत आहे बुडबुडे
जमिनीतून निघत आहे बुडबुडे
नवी दिल्ली : जग आता संपणार आहे, पृथ्वीचा नाश होणार आहे, अशा अनेक बातम्या वारंवार कानी पडतात. मात्र यातील अर्ध्या तर अफवा आणि दावे केलेले असतात. आत्तापर्यंत अशा केलेल्या अनेक भविष्यवाणी खोट्या ठरल्या आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून राजस्थानमध्ये विचित्र घटना घडत आहेत. या घटना पाहून हे सर्व येणाऱ्या महाप्रलयाचा संकेत तर नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
काही काळापूर्वी बिकानेरमध्ये अचानकपणे जमीन खचल्याची घटना घडली होती. रात्रीत जमिनीचा मोठा हिस्सा जमिनिधोस्त झाला. गेल्या काही दिवसांच्या रिसर्चनंतर सांगितलं गेलं की, पाण्याच्या कमतरतेमुळे ही घटना घडली. अनेक लोकांनी याला प्राकृतिक कहर असल्याचं म्हटलं. आता राजस्थानमध्ये अजब गजब घटना पहायला मिळाली.
advertisement
राजस्थानमध्ये जमिनीत बुडबुडे निघाल्याची घटना समोर आलीय. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झालाय. काही दिवसांपासून घडत असलेल्या या घटनेमुळे लोक चिंतेत पडले आहेत. हे जमिनीतून निघणारे बुडबुडे पाहण्यासाठी लोक लांबून लांबून येत आहेत.
दरम्यान, याविषयी एक्सपर्टनं सांगितलं की, याचा भूगर्भासोबत काही संबंध नाही. जमिनीतून असणारे पाईप आणि त्यातून निघणाऱ्या गॅसमुळे असं असावं. अशा सतत समोर येणाऱ्या घटनांमुळे लोकांच्या मनात भीती बसलीय की, आता खरंच मोठा प्रलय येणार की काय? असा प्रश्नही अनेकांना पडलाय.
view comments
मराठी बातम्या/Viral/
मोठं संकट येणार; या ठिकाणी जमिनीतून निघत आहे बुडबुडे, लोकांचा उडाला थरकाप!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement