advertisement

वराला सोडून दुसऱ्यासोबत पळाली वधू, गाडीच्या मागे धावत राहिला मुलगा!

Last Updated:

लग्नसराईची धामधूम सुरु असून अनेक लोक लग्न करत आहेत. वेगवेगळ्या पद्धतीनं आणि हटके स्टाईलमध्ये लग्न व्हावं यासाठी लोक खास तयारीही करतात.

लग्नातून पळाली नवरी
लग्नातून पळाली नवरी
नवी दिल्ली : लग्नसराईची धामधूम सुरु असून अनेक लोक लग्न करत आहेत. वेगवेगळ्या पद्धतीनं आणि हटके स्टाईलमध्ये लग्न व्हावं यासाठी लोक खास तयारीही करतात. मात्र अनेकदा लग्नादरम्यान जसं ठरवलं तसं घडत नाही. अनेक गोष्टी मनाविरुद्ध होतात. बऱ्याचदा अशा घटना सोशल मीडियावर व्हायरल झालेल्याही पहायला मिळतात.
लग्नात नवरा नवरीचं भांडण होतं, हाणामारी अशा घटना तर तुम्ही ऐकल्याच असतील. अनेकदा तर नवरा किंवा नवरी लग्नातून पळून जातात. अशाच एका घटनेचा व्हिडीओ इंटरनेटवर गराळा घालतोय. ज्यामध्ये नवरी लग्नातून पळून जाताना दिसतेय.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये नवरी ड्रेस पकडून लग्नातून पळत आहे आणि नवरदेव तिच्या मागे पळतोय. शिड्या उतरुन खाली येताच नवरीसाठी प्रियकराची गाडी उभी असते. ती लगेच कारमध्ये उडी घेते आणि निघून जाते. मागे पळत नवरदेव तिला पकडण्याचा प्रयत्न करतो मात्र तोपर्यंत ती गाडीत बसून धूम ठोकते. मग नवरदेव डोक्याला हात मारतो आणि पायातील शूज फेकतो. खाली बसून डोक्याला हात लावून तो दुःखी होतो.
advertisement
ninamariedaniele नावाच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भरपूर कमेंट पहायला मिळाल्या. अनेकांनी या व्हिडीओला फेक म्हटलं आहे. फक्त प्रसिद्धीसाठी असा स्टंट व्हिडीओ केल्याच्या अनेक कमेंट लोकांनी केल्या आहेत.
दरम्यान, व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ खरा आहे की फेक हे स्पष्ट झालं नाही. मात्र हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडवत आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
वराला सोडून दुसऱ्यासोबत पळाली वधू, गाडीच्या मागे धावत राहिला मुलगा!
Next Article
advertisement
NCP Merger: अजितदादांनी सगळं ठरवलं होतं, कोण होणार होतं राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यात कोणाचा चेहरा? फॉर्म्युला आला समोर
अजितदादांनी सगळं ठरवलं होतं, कोण होणार होतं राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यात कोणाचा चे
  • गील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणांच्या चर

  • राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या पडद्याआड झालेल्या बैठकांची माहिती समोर येऊ लागली

  • विलीनीकरणातील राष्ट्रवादीतील सत्ता वाटपाचं सूत्र निश्चित करण्यात आल्याची माहिती

View All
advertisement