beer: बिअरच्या कॅनने व्यक्तीला बनवलं लखपती, पण कसं काय? नेमकं काय घडलं?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
मद्य आरोग्यासाठी हानिकारक आहे हे माहित असतानाही लोक स्वतःवर ताबा ठेवू शकत नाही आणि मद्याच्या आहारी जातात. जगभरात असे अनेक मद्यप्रेमी सापडतील.
नवी दिल्ली : मद्य आरोग्यासाठी हानिकारक आहे हे माहित असतानाही लोक स्वतःवर ताबा ठेवू शकत नाही आणि मद्याच्या आहारी जातात. जगभरात असे अनेक मद्यप्रेमी सापडतील. अशा लोकांमुळे सतत घरामध्ये भांडण होतात. पैसे सगळे दारुमध्येच खर्च होतात. त्यामुळे घरात दारु पिणाऱ्यांवरुन सतत भांडण होताना पहायला मिळतं. मात्र एका व्यक्तीचं नशीब दारुमुळे बदललं आणि ती लाखोंची मालक बनली . हे प्रकरण सध्या सोशल मीडियावर लोकांचं लक्ष वेधून घेत आहे.
बिअर कॅनमुळे व्यक्ती मालामाल झाल्याचं प्रकरण समोर आलंय. दारुमुळे लोकांचं आयुष्य उद्भस्त होतं तिथे दारुमुळे एकाचं नशीब खुललं. हे वाचून तुम्हाला विचित्र वाटेल मात्र हे प्रकरण खरं असून दारु पिण्याची सवय व्यक्तीच्या कामात आली.
65 वर्षीय निक वेस्ट गेल्या 42 वर्षांपासून दारु पित आहे. त्याला बिअर पिण्याची सवय असून तो बिअर पिऊन त्याचे कॅन गोळा करायचा. कॅन साठवून ठेवण्याची सवय निकला मालामाल करुन गेली. त्यानं 42 वर्षात बिअर पिऊन त्याचे 10,300 कॅन जमा केले होते. त्यातील काही तर खूप कमी प्रमाणात मिळणारे होते.
advertisement
निक वेस्टनं सांगितलं त्याची कॅन साठवण्याची सवयीमुळे त्याला घरही छोटं पडू लागलं. तो ज्या रुममध्ये कॅन साठवायचा ती पूर्णपणे भरुन गेली. त्यानंतर त्याला त्याची सवय जपण्यासाठी नवं घर खरेदी करावं लागलं. रिटायरमेंटनंतर त्याला पैसै कमी पडू लागल्यावर त्यानं हे साठवलेले कॅन विकण्याचा निर्णय घेतला. 6000 कॅन विकून त्याला 14 लाख रुपये मिळाले. यूनिक कॅन असल्यामुळे त्याला जास्त पैसे मिळाले. त्यानंतर त्यानं पुन्हा शिल्ला कॅनपैकी काही कॅन विकले आणि पैसा मिळवला. अशा प्रकारे त्यानं कॅन विकून लाखो रुपये कमावले.
advertisement
दरम्यान, कोणाचा काय छंद त्याला पैसे मिळवून देईल सांगता येत नाही. लोक आजकाल पैसे कमावण्यासाठी अनेक विचित्र आणि अनोख्या गोष्टी करतात. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही लोक चांगले पैसे कमावतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 10, 2024 3:56 PM IST