TRENDING:

रक्ताने माखलेले पाय आणि हाताच्या खुणा, या रहस्यमयी मंदिराविषयी माहितीय का?

Last Updated:

जगभरात अनेक रहस्यमयी जागा आहेत. अशाही जागा आहेत ज्यांच्याविषयी बऱ्याच लोकांना माहित नाही. अशी काही रहस्य आहेत ज्यांच्याविषयी ऐकून कोणीही थक्क होईल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर : जगभरात अनेक रहस्यमयी जागा आहेत. अशाही जागा आहेत ज्यांच्याविषयी बऱ्याच लोकांना माहित नाही. अशी काही रहस्य आहेत ज्यांच्याविषयी ऐकून कोणीही थक्क होईल. अशाच काही रहस्यमयी मंदिरांविषयी जाणून घेणार आहोत जिथे रक्तरंजिक रहस्य दडलेली आहेत. ही मंदिरे कोणती आहेत, कुठे आहेत आणि काय रहस्य आहेत याविषयी जाणून घेऊयात.
छत रक्ताने भरलेलं रहस्यमयी मंदिर
छत रक्ताने भरलेलं रहस्यमयी मंदिर
advertisement

अशी काही कथित मंदिरे आहेत जी वर्षानुवर्षे रक्ताने माखलेली आहेत. ही मंदिरे जपानमधील योजेन-इन, गेन्को-आन, शोदेन-जी, होसेन-इन आणि मायोशिंजी आहेत.

burialsandbeyond च्या अहवालानुसार, 16व्या शतकातील फुशिमी किल्ल्यातील फरशीपासून मंदिरांचे छत बनवले आहे. जेथे जपानी सामुराई जनरल तोरी मोटोटाडा आणि त्यांच्या 380 योद्धांनी 40 हजार सैनिकांच्या शत्रूच्या सैन्याला 11 दिवस रोखून धरले. त्यावेळी दोन मोठ्या कुळांमध्ये लढाई सुरू होती. एका कुळाचे नेतृत्व जपानचे सर्वात शक्तिशाली सरदार टोकुगावा इयासू करत होते, तर दुसऱ्या कुळाचे नेतृत्व इशिदा मित्सुनारी करत होते.

advertisement

हृदय धडधडत नाही तरीही जिवंत आहे 'ही' महिला, विचित्र आजारानं ग्रस्त

टोकुगावा इयासूने टोकुगावा शोगुनेट, जपानमधील शेवटचे सरंजामशाही सरकार स्थापन केले. इशिदा मित्सुनारीने फुशिमा कॅसलवर 40 हजार सैनिकांसह हल्ला केला. इयासूच्या सैन्याने या हल्ल्याचा धैर्याने सामना केला. सामुराई जनरल टोरी मोटोटाडा यांच्या नेतृत्वाखाली इयासूच्या सैन्याने इशिदा मित्सुनारीच्या मागण्या मान्य करण्यास नकार दिला. दोन्ही सैन्यात घनघोर युद्ध झालं.

advertisement

मोटोटाडा आणि त्याच्या सर्व 380 सामुराई सैनिकांनी 11 दिवस शत्रूंना रोखून धरले, परंतु पराभव स्वीकारण्याऐवजी आणि आक्रमण करणार्‍या सैन्याच्या ताब्यात जाण्याऐवजी शत्रूंना रोखणे त्यांच्यासाठी कठीण झालं तेव्हा सर्व 380 सामुराई सैनिकांनी आपला जीव घेतला. त्याच्या अंगातून वाहत असलेल्या रक्तामुळे गडाच्या सभामंडपाचे लाकूड रक्तबंबाळ झालं. नंतर किल्ल्याच्या कॉरिडॉरमधील हेच लाकूड मंदिरांच्या छतावर वापरण्यात आलं. जेणेकरून मोटोटाडा आणि इतर सर्व 380 समुराई सैनिकांच्या बलिदानाचा सन्मान करता येईल आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळू शकेल.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात वाढ, तूर भाव घसरले, कापसाची काय स्थिती? Video
सर्व पहा

या खुणा, ज्यांना आता 'चितेंजो' म्हणतात. रक्ताचे डाग काही दिवसांचेच असल्यासारखे रक्ताने माखलेले पाय आणि हाताच्या खुणा अजूनही त्या मंदिरांमध्ये स्पष्टपणे दिसतात.

मराठी बातम्या/Viral/
रक्ताने माखलेले पाय आणि हाताच्या खुणा, या रहस्यमयी मंदिराविषयी माहितीय का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल