गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड एका स्टेडिअमध्ये असतात आणि बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला प्रपोज करतो. मात्र गर्लफ्रेंड त्याच्यासोबत धक्कादायक गोष्ट करते. ती त्याला चापट मारते आणि त्याच्या अंगावर हातातील ड्रिंक फेकते.
Weekly Holiday : साप्ताहिक सुट्टी रविवारीच का दिली जाते? यामागे काय लॉजिक आहे
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बॉयफ्रेंड गर्लफेंड स्टेडिअमध्ये आहेत. दोघेही रोमान्स करत असतात. अचानक बॉयफ्रेंड गुडघ्यावर बसतो आणि रिंग काढतो. गर्लफ्रेंडला प्रपोज करणार तोच ती शॉक होते. तरुणीला वाटतं की त्यात हिऱ्याची किंवा सोन्याची अंगठी असेल आणि प्रियकर तिचं स्वप्न भंग करतो. सोन्याच्या किंवा डायमंडच्या अंगठीऐवजी, बॉक्समधून कँडी रिंग बाहेर काढतो. हे पाहून तरुणी त्याला चापट मारते. ती एवढ्यावरच थांबत नाही. ती त्याच्या अंगावर ड्रिंकही फेकते. बॉयफ्रेंडसहित स्टेडिअमधील लोकही तिच्या या रिअॅक्शनवर थक्क होतात.
advertisement
@NoCapFights नावाच्या X अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 9 सेकंदांचा हा व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होतोय. व्हिडीओवर भरपूर कमेंटही येताना दिसत आहेत.
