'लव्ह मॅरेजनंतरचा पहिला दिवस', असं कॅप्शन या व्हिडीओला महिलेनं दिलं आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता पती-पत्न दोघं झोपले आहेत. सकाळ होताच पत्नीला अचानक जाग येते ती तिच्या पतीला मोठ्याने आवाज देत उठवू लागते. ती म्हणते, 'कुशल, उठ, 8 वाजले आहेत.' जेव्हा नवरा तिला झोपायला सांगतो तेव्हा वधू म्हणते, 'बाहेरचे सगळे काय विचार करतील?' शेवटी ती कशाबद्दल बोलत आहे, हा प्रश्न तुमच्या मनातही निर्माण होईल. पण व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्व काही स्पष्ट होईल.
advertisement
हनीमूनसाठी मनाली गेलं कपल, पती-पत्नीचा रोमँटिक Video Viral, पाहताच लोक म्हणाले, 150 रुपये...
यानंतर ती आंघोळ करायला जाते आणि बाहेर येते आणि साडी घालू लागते. मग नवरा बाथरूममधून बाहेर येतो आणि विचारतो की तू काय करतेस? बायको म्हणते, मी साडी नेसण्याचा प्रयत्न करत आहे, पण ते होत नाहीये. नवरा तिला साडीऐवजी दुसरा ड्रेस घालायला सांगतो. पण वधू नकार देते. नंतर पती पत्नीला साडी नेसण्यास मदत करतो. मग स्वयंपाकघरात नवविवाहित वधू शीरा बनवते. ते कसं बनेल याबाबत तिला टेन्शन येतं. पण नवरा म्हणतो की काही फरक पडत नाही, जर ते नीट बनलं नाही तर आपण स्विगी करू.
नंतर घरी काही पाहुणेही आले आहेत. प्रेमविवाह करणारे जोडपे त्यांना भेटायला जातं. वधूची सासू त्यांच्याशी बोलत असते. वधूला साडीत पाहून पाहुणेही आनंदी दिसतात. पाहुणा म्हणतो, "तुमच्या सुनेनं साडी नेसली आहे, ती खूप सुंदर दिसते." मग सासू स्पष्टपणे म्हणते, ती माझी सून नाही, ती माझी मुलगी आहे.
लग्न कराल तर जास्त जगाल! संशोधन सांगतंय लग्न केल्याने वाढतं वय, पण कसं काय?
कुशल आणि खुशी या कपलने @kushalkikhushi या त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडिओवर कमेंट करताना अनेक महिला युझर्सनी लिहिलं आहे की, मलाही असा नवरा आणि सासू मिळावी अशी इच्छा आहे. पुरुषांनीही पॉझिटिव्ह प्रतिक्रिया दिल्या आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला, तुमची प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.