पूर्वीचा केक आताच्या केकप्रमाणे नव्हता. पूर्वीचे केक आज आपल्याला माहीत असलेल्या केकपेक्षा खूप वेगळे होते. ते ब्रेडसारखे अगोड होते. सर्वात जुने केक प्राचीन इजिप्तमध्ये तयार केले गेले, असं मानलं जातं.
आधुनिक केक कोणी तयार केला?
आज आपण बनवत असलेल्या केकमध्ये मैदा, साखर, अंडी, लोणी किंवा तेल, बेकिंग पावडर, फळे, चॉकलेट किंवा काजू असं काही वापरलं जातं. हा केक सहसा ओव्हनमध्ये बेक केला जातो. आधुनिक कालखंडात पहिला चॉकलेट केक 1764 साली डॉ. जेम्स बेकर आणि जॉन हॅनन यांनी तयार केला होता.
advertisement
Ice cream : आईस्क्रिमला मराठीत काय म्हणतात? सांगा पाहू; नाव वाचूनच गार पडेल तोंड
1800 च्या दशकाच्या सुरुवातीस, ब्रिटीश बेकर्सने केक हलका आणि फ्लफीर बनवण्यासाठी सोडियम बायकार्बोनेट म्हणजे बेकिंग सोडा आणि टार्टर म्हणजे पोटॅशियम बिटाट्रेटसारख्या रासायनिक खमीरयुक्त एजंट्स वापरण्यास सुरुवात केली. याला क्विक ब्रेड म्हटलं जातं, कारण यीस्ट वाढण्याची प्रतीक्षा न करता ते पटकन तयार करता येतात. अमेरिकन बेकर्सनी 19 व्या शतकाच्या मध्यात या पद्धतींचा अवलंब केला. अशा प्रकारे आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचलेल्या केकची निर्मिती झाली.
केकचा अर्थ काय?
केक हा शब्द जुना नॉर्स शब्द काकापासून आला आहे, काका म्हणजे फ्लॅटब्रेड. सुरुवातीचा केक बिस्किटं, कुकीजसारखाच होता, सपाट आणि कोरडा. बहुतेकदा त्यांच्यात फळे किंवा काजू घालून त्यांना चव आणली जात होती. नंतरच्या काळात मधाचा वापर गोडवा आणण्यासाठी केला जाऊ लागला. याशिवाय चवीसाठी सुका मेवा आणि इतर मसाले घातले जात असत. कालांतराने यीस्टचा वापर करून त्याला हलका आणि मऊ करण्यात आले.
General Knowledge : दररोज वापरता खरं, पण लिफ्टला मराठीत काय म्हणतात माहितीये? 99 टक्के लोक फेल
केकला मराठीत काय म्हणतात?
केकला मराठीत काय म्हणतात याची माहिती अनेकांना नाही. तुम्हाला याचा मराठी शब्द माहिती असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
