असे काही लोक आहेत ज्यांना जुन्या गोष्टींचा अभ्यास करायला आवडत. अमेरिकेतील अशीच एक व्यक्ती, अमेरिकेन युट्युबर अॅक्वाचिगरने मे 2022 मध्ये त्याच्या युट्युब चॅनेलवर जंगलाच्या मध्यभागी असलेल्या विहिरीचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. युट्युबरने व्हिडीओमध्ये या विहिरीबाबत माहितीही दिली आहे. ही खूप जुनी दगडी विहीर आहे. जी खडक कापून बनवण्यात आली आहे. जंगलाच्या मध्यभागी बांधलेली विहीर झाकलेली आहे. जेणेकरून त्यात कोणताही प्राणी पडू शकत नाही.
advertisement
गुहेतून यायचा घंटीचा आवाज; 3 महिन्यांनी असं काही बाहेर आलं की अख्खं गाव थरथर कापू लागलं
व्हिडिओच्या सुरुवातीला तो लाईट लावून विहिरीच्या आत पाहण्याचा प्रयत्न करतो, पण विहीर खूप खोल आहे. विहिरीच्या आत काय आहे हे पाहण्यासाठी या व्यक्तीने त्यात कॅमेरा टाकला. त्याने या विहिरीच्या आत गो प्रो कॅमेरा पाठवला. या कॅमेऱ्यात धक्कादायक दृश्य कैद झालं आहे.
विहिरीच्या आत काय होतं?
विहीर झाकलेली होती तरी आतमध्ये भीतीदायक प्राणी दिसले. कदाचित थोड्याशा जागेतून ते विहिरीत गेले असावेत आणि या विहिरीलाच आपलं घर बनवलं. Aquachigger युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा.
अंतराळात झाला मोठा स्फोट; कशाचा म्हणून शास्त्रज्ञांनी तपास केला आणि धक्काच बसला
या व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत. बरेच लोक घाबरले आहेत. एका युझरने हा मरणाचा भयंकर मार्ग असल्याचं म्हटलं आहे. तर एकाने मला कोणी कितीही पैसे दिले तरी मी या भयानक विहिरीच्या आत जाणार नाही, असं म्हटलं आहे. तर काहींनी विहिरीच्या रचनेचंही कौतुक केलं आहे.
