TRENDING:

Viral Video : कुत्र्याचा जीव वाचवण्यासाठी मांजरीची झुंज, 3 कोल्ह्यांना लावलं पळवून

Last Updated:

अनेक निरनिराळ्या प्राण्यांचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. प्राण्यांच्या हल्ल्याच्या घटनाही इंटरनेटवर तुफान चर्चेत असतात. कोणता प्राणी कधी येऊन कोणावर हल्ला करेल काही सांगू शकत नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : अनेक निरनिराळ्या प्राण्यांचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. प्राण्यांच्या हल्ल्याच्या घटनाही इंटरनेटवर तुफान चर्चेत असतात. कोणता प्राणी कधी येऊन कोणावर हल्ला करेल काही सांगू शकत नाही. त्यामुळे प्राण्यांविषयी जेवढा लोकांना जिव्हाळा आहे तेवढीच भीतीदेखील आहे. त्यामुळे लोक बऱ्याचदा प्राण्यांपासून दूर पळताना दिसतात. अशातच एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये एक मांजर कुत्र्याचा जीव वाचवण्यासाठी तीन कोयोट्ससोबत लढली. काही सेकंदाच्या या व्हिडीओनं तुम्हीही थक्क व्हाल.
कुत्र्याचा जीव वाचवण्यासाठी मांजरीची झुंज
कुत्र्याचा जीव वाचवण्यासाठी मांजरीची झुंज
advertisement

कुत्रा आणि मांजर यांचं भांडण जगभर प्रसिद्ध आहे. मात्र यावेळी कुत्र्याला वाचवण्यासाठी मांजर पुढे सरसावली असं पहायला मिळालं. एवढंच नाहीतर तिनं तीन कोयोट्ससोबत दोन हातही केले. कोयोट्स हा एक कोल्ह्याचा प्रकार आहे.

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एडमंड, नॉर्थ डकोटा, अमेरिकेत एक लहान कुत्रा बाहेर फिरत होता. ज्याचं नाव ओकले होतं. लहानव कुत्रा फिरत असताना तेथे तीन कोयोट्स आले त्यांनी त्याच्यावर हल्ला केला. रस्त्याच्या मागील बाजूने एक मांजर आली आणि कुत्र्याला वाचवण्यासाठी धावली. कोयोटांनी मांजर पाहिल्याबरोबर तेथून पळ काढला.

advertisement

Freedom Dog Spa या फेसबुत अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे जो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. 17 सेकंदांचा हा व्हिडीओ इंटरनेटवर सर्वांचं लक्ष वेधण्याचं काम करत आहे. कारण नेहमीच कुत्रा आणि मांजरीला भांडण करताना पाहिलं जातं यावेळी त्यांनी एकमेकांचा जीव वाचवला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात वाढ, तूर भाव घसरले, कापसाची काय स्थिती? Video
सर्व पहा

दरम्यान, मांजरीच्या धाडसाचं लोक कमेंटमध्ये कौतुक करत आहेत. हा व्हिडीओ काहीच वेळात खूप व्हायरल झाला. असे प्राण्यांचे थक्क करणारे अनेक व्हिडीओ समोर येत असतात.

मराठी बातम्या/Viral/
Viral Video : कुत्र्याचा जीव वाचवण्यासाठी मांजरीची झुंज, 3 कोल्ह्यांना लावलं पळवून
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल