व्हिडीओमध्ये एक चायनीज महिला आपल्या लिव्हिंग रूममध्ये सोफ्यावर बसून मोबाईल पाहत असते. तिच्याभोवती तीन पाळीव मांजरी वेगवेगळ्या ठिकाणी बसलेल्या असतात. याच वेळी, टीव्ही युनिटजवळ बसलेल्या एका मांजरीला काहीतरी वेगळं जाणवतं आणि ती लगेच सतर्क होते. काही सेकंदात दुसऱ्या मांजरांचं देखील त्याकडे लक्ष जातं. काही काळ ते एक टक त्या भिंतीकडे बघू लागतात मग घाई करुन उडी मारुन त्या ठिकाणावरुन बाजूला होतात. मांजरांचं असं वागणं पाहून तिथे बसलेली महिला सतर्क होते आणि काय झालं अशी रिएक्शन देत त्या ठिकाणावरुन बाजूला होते आणि तेवढ्यात टीव्ही युनिटची भिंत खाली पडते.
advertisement
जर ती महिला तिथेच बसून राहिली असती आणि क्षणाचा जरी बिलंब झाला असता तरी गंभीर अपघात होऊ शकला असता. पण मांजरींनी वेळेवर धोका ओळखल्यामुळे महिलेचे प्राण वाचले आहे.
हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे ‘phoenixtv_news’ नावाच्या इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून लोकांनी मांजरींच्या संवेदनशीलतेचे कौतुक केलं आहे. एक युजर म्हणतो, "मांजरी आधीच धोका ओळखतात." तर दुसऱ्याने लिहिलं, "पाळीव मांजरी नसत्या तर मालकीण आज वाचली नसती."
हा प्रसंग सिद्ध करतो की, फक्त माणसांनाच नाही तर प्राणीमात्रांनाही धोका जाणवण्याची अद्भुत क्षमता असते.