आपल्या आयुष्यात नकळत झालेल्या चुका किंवा साध्या अपघातांमुळे अनेकदा आश्चर्यकारक आणि अविस्मरणीय परिणाम मिळतात, जे खूपच आश्चर्यकारक असतात. अमेरिकेतील कोलोरॅडो येथील अँड्रियासोबतही असंच काही घडलं. तिच्या 4 वर्षांच्या मुलाच्या एका छोट्याशा चुकीमुळे अजब घटना घडली. तिला आश्चर्य वाटलं. तिच्या मुलाने चुकून तिच्या बागेतल्या डाहलियाच्या झाडांमध्ये पॉपकॉर्नचा दाणा टाकला. पण त्यानंतर जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल. पॉपकॉर्नच्या दाण्यांनी तिच्या बागेत चमत्कारच केला.
advertisement
Indian Railway : ट्रेनमध्ये घरचं अन्न घेऊन जाणं महागात! प्रवाशांना 10,26,670 रुपयांचा दंड, कारण काय?
अँड्रियाला तिच्या डाहलियाच्या झाडांमध्ये उंच मक्याची रोपं वाढताना दिसली. व्हिडिओमध्ये ती ही मक्याची रोपं दाखवते आणि सांगते, "माझ्या चार वर्षांच्या मुलीने पॉपकॉर्नची बाटली टाकली आणि पाहा काय झालं, ते कॉर्नमध्ये बदललं."
अँड्रिया अनेकदा तिच्या बागेत विशेष फुले आणि भोपळे लावत असे. अलीकडेच तिने तिच्या ऑनलाइन फॉलोअर्ससोबत एक अनोखी घटना शेअर केली. तिने स्पष्ट केलं की तिच्या चार वर्षांच्या मुलाने चुकून तिच्या लटकत्या बागेत वाळलेल्या पॉपकॉर्नचे दाणे टाकले. काही महिन्यांनंतर तिथं मक्याची रोपं उगवली.
Shocking! जेवल्या जेवल्या लगेच बाथरूमला गेला, झाला मृत्यू; नेमकं घडलं काय?
तिने हे कॉर्न तोडून त्याचे पॉपकॉर्न बनवू शकतो का ते पाहण्याचा निर्णय घेतला.अँड्रिया आणि तिची मुलं कॉर्न काढतात. कागदी पिशवीत ठेवून मायक्रोवेव्हमध्ये ठेवतात. पण पहिल्या प्रयत्नात पॉपकॉर्न निघाले नाहीत, कदाचित ते ओले असल्याने. पण दुसऱ्या वेळी पॉपकॉर्न फुटण्याचा आवाज येऊ लागला. बॅग उघडली तेव्हा, काही कॉर्न प्रत्यक्षात पॉपकॉर्नमध्ये बदलले होते. पण ते सामान्य पॉपकॉर्नसारखे पांढरे आणि मऊ नव्हते, तर किंचित पिवळसर रंगाचे होते. अँड्रिया म्हणाली, कॉर्न ओल्या असल्यामुळे पूर्णपणे पॉपकॉर्न झाले नव्हते. तिने सांगितले की ती ते पूर्णपणे सुकण्यासाठी काही आठवडे ठेवेल.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावरील अनेक लोकांना आश्चर्य वाटलं. एकाने लिहिलं, "आज मला कळलं की पॉपकॉर्न फक्त सामान्य कॉर्न नाही." दुसऱ्याने लिहिलं की पॉपकॉर्नसाठी कॉर्नची कापणी फक्त देठ आणि पाने पूर्णपणे सुकल्यानंतर आणि तपकिरी झाल्यावरच करावी.