लग्नानंतर अंजली आणि चंदन हनीमूनसाठी मनालीला जातात. तिथे पोहोचल्यानंतर दोघांनीही एका आलिशान हॉटेलमध्ये रूम बुक केली. हनिमून प्लॅननुसार त्यांची रूमही हॉटेल कर्मचाऱ्यांनी चांगली सजवली होती. बेडवर पांढरी चादर आणि त्यावर लाल गुलाब फुलांच्या पाकळ्यांनी एक हार्ट बनवलं होतं. आणि त्याभोवती फुले पसरली होती.काही पिवळी फुले वापरून रूमला एक अद्भुत लूक देण्यात आला. रूम खूपच रोमँटिक वाटत होती.
advertisement
तिथे त्या बेडवर नवविवाहित वधू लाल ड्रेस घालून बसली होती आणि तिच्या नवऱ्याची वाट पाहत होती. जेव्हा तिचा नवरा येतो तेव्हा त्याची खास भेट पाहून पत्नी अवाक होते. नवरा प्रेमाने तिला आयफोन भेट देतो. आयफोन पाहिल्यानंतर पत्नी खूप आनंदी होते आणि तिच्या पतीचे आभार मानते.
जेव्हा तो हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतो तेव्हा त्याला लाखो व्ह्यूज आणि लाखो लाईक्स मिळतात. काही युझर्स कमेंट करून या कपलचं कौतुक करतात, तर काहींनी मजाही केली. जसं एका युझरने तू भाग्यवान आहेस असं म्हटलं आहे. तर एकाने तो 150 रुपये देईल...' असं लिहिलं आहे. तुमची या व्हिडीओवरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.