अॅरिझोनामधील ही धक्कादायक घटना आहे. रेना ओ रुरके असं या तरुणीचं नाव आहे. तिनं सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक ट्रेंड फॉलो केला. सोशल मीडियावर बरेच ट्रेंड असतात. पण रेना ओ रुरकेने फॉलो केलेला ट्रेंड खूप खतरनाक होता. तिच्या पालकांनी सांगितल्यानुसार तिने डस्टिंग किंवा क्रोमिंग चॅलेंज फॉलो केलं होतं. ज्यामुळे तिला हार्ट अटॅक आला. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं आणि जवळजवळ एक आठवडा ती कोमात राहिली. दुर्दैवाने, डॉक्टरांनी नंतर तिला ब्रेनडेड घोषित केलं.
advertisement
महिलांनो गर्भनिरोधक गोळी घेताय सावधान! मुंबईतील 27 वर्षीय महिलेला आला Heart Attack, पण कसं काय?
तिचे वडील आरोन यांनी एझेड फॅमिलीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, ती नेहमी म्हणायची बाबा मी प्रसिद्ध होणारच, तुम्ही फक्त पाहा मी प्रसिद्ध होणारच. दुर्दैवाने, कोणत्याही पालकांना आपल्या मुलांना अशी प्रसिद्धी मिळेल असं वाटलं नसेल.
डस्टिंग किंवा क्रोमिंग म्हणजे काय?
ज्यात घरात वापरली जाणारी केमिकल श्वासाने हुंगून घ्यायचे असतात. ही धोकादायक क्रिया आहे. ज्यामुळे आरोग्य तज्ञ आणि पालकांमध्ये चिंता वाढत आहे. अनेक सोशल मीडिया युझर्स जास्तीत जास्त ऑनलाईन व्ह्युजसाठी हा ट्रेंड फॉलो करत आहेत, ज्यात ते कीबोर्ड क्लिनिंग स्प्रे श्वासाने घेत स्वतःचा व्हिडीओ शूट करत आहेत.
Shilajit : पुरुषांची मर्दांनगी वाढवणारं शिलाजीत महिलाही खाऊ शकतात का? खाल्लं तर काय होईल?
अॅरिझोना येथील ऑनरहेल्थ स्कॉट्सडेल ऑसबॉर्न मेडिकल सेंटरमधील इंटेन्सिव्ह केअर युनिटचे प्रमुख डॉ. रँडी वेइसमन यांनी एझेड फॅमिलीशी बोलताना या ट्रेंडचे वर्णन अत्यंत चिंताजनक असं केलं. ते म्हणाले, कीबोर्ड क्लीनरसारख्या उत्पादनांमधून वायू श्वास घेतल्याने फुफ्फुस आणि रक्तप्रवाहातील ऑक्सिजनची जागा घेतली जाते, ज्यामुळे महत्त्वाच्या अवयवांना ऑक्सिजनची कमतरता भासते.
जरी यामुळे अल्पकालीन आनंद मिळत असला तरी त्याचे दीर्घकालीन परिणाम विनाशकारी असू शकतात. यामुळे यकृत निकामी होणं, हार्ट फेल आणि फुफ्फुसांचे गंभीर नुकसान होऊ शकतं," असं डॉ. वेइसमन म्हणाले.