महिलांनो गर्भनिरोधक गोळी घेताय सावधान! मुंबईतील 27 वर्षीय महिलेला आला Heart Attack, पण कसं काय?

Last Updated:

Contraceptive pills cause heart attack : गर्भनिरोधक गोळ्या घेणारी ही मुंबईतील 27 वर्षांची महिला. सुरुवातीला तिला अॅसिडीटीचा त्रास वाटला. पण एकदिवस तर मध्यरात्री तिचा त्रास भयंकर वाढला. तिच्या छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या. तिला हार्ट अटॅक आल्याचं निदान झालं.

प्रतीकात्मक फोटो (AI Generated image)
प्रतीकात्मक फोटो (AI Generated image)
नवी दिल्ली : 27 वर्षांची पायल एक सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे. ती मुंबईच्या माहीममध्ये राहतं. नुकतंच तिचं लग्न झालं. तिच्या छातीत जळजळल्यासारखं वाटत होतं. सुरुवातीला तिला अॅसिडीटीचा त्रास वाटला. पण एकदिवस तर मध्यरात्री तिचा त्रास भयंकर वाढला. तिच्या छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या. मध्यरात्री 2 वाजता तिला रुग्णायलात नेण्यात आलं. तिथं तपासण्या केल्या असता आणि तिला हार्ट अटॅक आल्याचं निदान झालं.
पायलच्या हृदयविकाराच्या झटक्याने तिच्या कुटुंबाला धक्का बसला कारण एक तर ती फक्त 27 वर्षांची आहे आणि दुसरं म्हणजे महिलांमधील इस्ट्रोजेन हार्मोनमुळे त्यांना हार्ट अटॅकपासून संरक्षण मिळतं. कारण हे हार्मोन रक्तवाहिन्या रक्तप्रवाहासाठी पुरेशा रुंद ठेवतात आणि जळजळ कमी करतात. मग पायलला हार्ट अटॅक आला कसा? तर याचं कारण होतं ते गर्भनिरोधक गोळ्या.
advertisement
चर्नी रोडजवळील सैफी हॉस्पिटलमधील हृदयरोगतज्ज्ञ आणि पायलवर उपचार करणारे डॉ. कौशल छत्रपती यांनी सांगितलं, पायलच्या बाबतीत हार्ट अटॅक येण्याचं कारण म्हणजे तिला पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) साठी लिहून दिलेल्या गर्भनिरोधक गोळ्या होत्या. हा एक हार्मोनल विकार आहे ज्यामध्ये मासिक पाळी अनियमित होते आणि अंडाशयांवर सिस्टची उपस्थिती असते.
advertisement
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार पायलच्या वडिलांनी सांगितलं की तिला जवळजवळ दहा वर्षांपासून पीसीओएसचा त्रास होत होता आणि तिच्या स्त्रीरोगतज्ज्ञांनी सात वर्षे गर्भनिरोधक गोळ्या लिहून दिल्या.
फेब्रुवारीमध्ये 'द बीएमजे' मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या डेन्मार्कच्या एका अभ्यासात असं आढळून आलं की सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या हार्मोनल गर्भनिरोधक ज्यात इस्ट्रोजेन-प्रोजेस्टिन असतं ही गोळी इस्केमिक स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका दुप्पट करतं.
advertisement
संशोधनानुसार एक वर्षासाठी ही गोळी घेणाऱ्या प्रत्येक 4760 महिलांना एक अतिरिक्त स्ट्रोक आणि प्रत्येक 10000 महिलांना एक अतिरिक्त हृदयविकाराचा झटका आला आहे.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
महिलांनो गर्भनिरोधक गोळी घेताय सावधान! मुंबईतील 27 वर्षीय महिलेला आला Heart Attack, पण कसं काय?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement