Success Story: घरी फक्त एक एकर शेती, तरुण शेतकऱ्यानं केला झेंडूचा प्रयोग, कमाई 5 लाख
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
Beed Farmer: शेतीची आवड असलेला हनुमान शैक्षणिक वाटचालीसोबतच स्वतःच्या शेतीत नवनवीन प्रयोग करत आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
हनुमान वानखेडेने सांगितलं की, शेती हा केवळ व्यवसाय नसून ते एक विज्ञान आहे. त्यासाठी योग्य ज्ञान आणि मेहनत लागते. हनुमान आत्मविश्वासाने इतर स्थानिक शेतकर्यांना देखील आधुनिक शेतीच्या तंत्रज्ञानाची माहिती देतो. स्वतःचा व्यवसाय वाढवत असताना गावातील इतर शेतकऱ्यांनाही फायदा व्हावा, अशी त्याची इच्छा आहे.
advertisement
हनुमानच्या यशोगाथेमुळे टालेवाडी गावातील तरुण पिढीमध्ये एक नवी प्रेरणा निर्माण झाली आहे. शेती करण्यात काही अर्थ उरला नाही, असं मानणाऱ्या अनेकांना हनुमानने आपले विचार बदलण्यास भाग पाडलं आहे. त्याच्या गावातील अनेक शेतकरी त्याच्या मार्गदर्शनाखाली शेतीच्या नवीन पद्धती अवलंबण्यास तयार झाले आहेत. त्यामुळे गावातील शेतीत मोठा बदल दिसून येत आहे.
advertisement