Amitabh Bachchan: हॉटेल रुम अन् महिला चाहतीने साडीच फेडली; अमिताभ बच्चनसोबत घडलेला घाबरवणारा प्रसंग
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Amitabh Bachchan: बॉलिवूडचा शहंशाह अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यात अनेक किस्से आहेत. लाखो चाहते त्यांना देवासारखं पूजतात, पण चाहत्यांचं हे अतीव प्रेम कधी-कधी त्यांच्यासाठी संकट ठरतं.
advertisement
advertisement
त्या काळात अमिताभ बच्चन एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी बाहेरगावी गेले होते. दिवसभराचं काम आटोपून ते हॉटेलमध्ये परतले. पण खोलीत प्रवेश करताच त्यांना धक्का बसला. खोलीत एक तरुणी बराच वेळ त्यांची वाट पाहत बसली होती. प्रथम त्यांनी तिला बाहेर जाण्यास सांगितलं, पण ती हललीही नाही. उलट ती सतत एकच वाक्य म्हणत राहिली, "मी तुमच्यावर खूप प्रेम करते."
advertisement
advertisement
advertisement
advertisement
1975 हे वर्ष अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीचं टर्निंग पॉईंट होतं. ‘दीवार’ आणि ‘शोले’ सारख्या चित्रपटांनी त्यांना सुपरस्टार बनवलं होतं. देशभरातील प्रेक्षक, विशेषतः तरुणी, त्यांच्या अभिनयावर आणि व्यक्तिमत्त्वावर अक्षरशः वेड्या झाल्या होत्या. पण याच चाहत्यांच्या अति उत्साहामुळे त्यांना असे विचित्र आणि धोकादायक प्रसंगही अनुभवावे लागले.