'क्रिकेटचा देव' होणार BCCI चा बॉस? अध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी सचिनने दिली मोठी अपडेट!

Last Updated:

सौरव गांगुली आणि रॉजर बिनी यांच्यानंतर आता सचिन तेंडुलकर बीसीसीआयचा अध्यक्ष होईल, अशी वृत्त समोर आली होती. यानंतर आता सचिनने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

'क्रिकेटचा देव' होणार BCCI चा बॉस? अध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी सचिनने दिली मोठी अपडेट!
'क्रिकेटचा देव' होणार BCCI चा बॉस? अध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी सचिनने दिली मोठी अपडेट!
मुंबई : भारताचे माजी क्रिकेटपटू रॉजर बिनी 70 वर्षांचे झाल्यानंतर त्यांना बीसीसीआयचं अध्यक्षपद सोडावं लागलं, यानंतर आता राजीव शुक्ला यांच्याकडे अंतरिम जबाबदारी देण्यात आली आहे. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बीसीसीआयचा नवा अध्यक्ष निवडला जाणार आहे. सौरव गांगुली आणि रॉजर बिनी यांच्यानंतर आता आणखी एक क्रिकेटपटू बीसीसीआयचा अध्यक्ष होईल, अशी माहिती काहीच दिवसांपूर्वी समोर आली होती, यानंतर सचिन तेंडुलकर बीसीसीआयचा अध्यक्ष होऊ शकतो, असं वृत्तही समोर आलं होतं. या सगळ्या चर्चांवर खुद्द सचिन तेंडुलकरने प्रतिक्रिया दिली आहे.

सचिनकडून पहिली प्रतिक्रिया

सचिन तेंडुलकरच्या टीमकडून याबाबतचं प्रसिद्धी पत्रक काढण्यात आलं आहे. 'बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी सचिन तेंडुलकरच्या नावाचा विचार सुरू आहे, तसंच त्याने नामांकन दाखल केलं आहे, अशी वृत्त समोर आल्याचं आमच्या लक्षात आलं आहे, पण अशा कोणत्याही घटना घडलेल्या नाहीत. अशी वृत्त म्हणजे निव्वळ अफवा आहेत', असं सचिन तेंडुलकरच्या टीमकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. सचिन तेंडुलकरने स्वतः याबाबत टिप्पणी केली नसली, तरी त्याच्या टीमने मात्र या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
advertisement
बीसीसीआयच्या निवडणुका या 28 सप्टेंबरला होणार आहेत. ज्यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संयुक्त सचिव आणि कोषाध्यक्ष या पदांसाठी मतदान होणार आहे. तर विद्यमान सचिव देवजित सैकिया, संयुक्त सचिव रोहन गौंस देसाई आणि कोषाध्यक्ष प्रभतेज सिंग भाटी हे त्यांच्या पदावर कायम राहतील. बीसीसीआयच्या सभेमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष तसंच आयपीएलच्या अध्यक्षाचीही निवड होणार आहे.
advertisement
राज्य संघटनांना वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी (एजीएम) त्यांच्या प्रतिनिधींची नावे सादर करण्याची शुक्रवार 12 सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे. या यादीतून मोठ्या पदांवर कुणाची वर्णी लागणार? याचे संकेत मिळण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
'क्रिकेटचा देव' होणार BCCI चा बॉस? अध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी सचिनने दिली मोठी अपडेट!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement