Prajakta Gaikwad : प्राजक्ता गायकवाड झाली जिल्हाधिकारी? काय आहे फोटोमागचं सीक्रेट

Last Updated:

Prajakta Gaikwad : अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड तिच्या साखरपुड्यामुळे चर्चेत होती. अशातच तिचा एक फोटो समोर आला आहे जो पाहून अनेकांना भुवया उंचावल्यात.

News18
News18
मुंबई : स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील येसूबाई म्हणजेच अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिनं काही दिवसांआधीच साखरपुडा. शंभुराज खुटवड असं प्राजक्ताच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आहे. प्राजक्ता आणि शंभुराज लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. प्राजक्ताच्या साखरपुड्याचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळतेय. अशातच प्राजक्ता गायकवाडचा एक फोटो समोर आला आहे जो पाहून अनेकांना भुवया उंचावल्यात.
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडनं एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिनं साडी नेसली आहे. साडी नेसून ती एका कारच्या पुढ्यात उभी आहे. ही कार साधी सुधी कार नाहीये. ही कार एका जिल्हाधिकाऱ्याची आहे. डोळ्याला गॉगल अन् साधी साडी नेसून कारच्या बोनेट हात ठेवून प्राजक्तानं हा फोटो क्लिक केला आहे. फोटोमध्ये दिसत असलेल्या कारवर भारताचा झेंडा लावलेला आणि कारवर महाराष्ट्र शासन जिल्हाधिकारी MH 14 DX 8081 असं लिहिलं आहे.
advertisement
प्राजक्ताचा हा फोटो पाहून प्राजक्ता जिल्हाधिकारी झाली की काय असं तिच्या अनेक चाहत्यांना वाटलं. पण प्राजक्ताने शेअर केलेला हा फोटो खरा नसून तिच्या आगामी सिनेमातील आहे. प्राजक्ताने तिच्या फोटो कॅप्शनमध्ये याचा खुलासा केला आहे.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Prajakta Gaikwad (@prajaktaa.gaikwad)



advertisement
न्यू फिल्म... Batch No 22 असं कॅप्शन देत प्राजक्ताने हा फोटो शेअर केला आहे. Batch No 22 असं प्राजक्ताच्या नव्या सिनेमाचं नाव आहे. आता या सिनेमात ती कोणत्या अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.
प्राजक्ताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास, स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेनंतर ती फार मोठ्या सिनेमा किंवा मालिकेत दिसली नाही. तिचे काही आगामी सिनेमे पाइप लाइनमध्ये आहेत. प्राजक्ता सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिचे साडींमधील कमाल फोटोशूट ती शेअर करत असते.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Prajakta Gaikwad : प्राजक्ता गायकवाड झाली जिल्हाधिकारी? काय आहे फोटोमागचं सीक्रेट
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement